लखनौ Pakistan Sister Threat To Brother : पाकिस्तानात राहणाऱ्या बहिणीनं भावाच्या मालमत्तेत हिस्सा घेण्यासाठी धमकी दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मेरठ पोलीस ठाण्यात पीडित भावानं तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी लिसाडीगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आसिम बेग असं पीडित भावाचं नाव आहे. उजमा असं पाकिस्तानातून धमकी देणाऱ्या बहिणीचं नाव आहे.
रावळपिंडीतील सदर बाजारला राहते बहीण : भाऊ आसिम बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीगेट पोलीस स्टेशन परिसरात कासिम बेग हे राहत होते. त्यांची मुलगी उजमा हिचा विवाह 22 वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या रावळपिंडीतील सदर बाजार इथल्या तनवीरशी झाला होता. लग्नानंतर उजमा पाकिस्तानला राहण्यासाठी गेली होती. उजमाला चार मुलं असून वडील कासिम यांचं निधन झालं आहे. कासिम यांचा मुलगा आसिम श्यामनगर इथं तर मुलगी शबनूर हुसेनाबाद इथं राहते. पाकिस्तानात राहणारी उजमा 8 नोव्हेंबरला भारतात आली होती. यावेळी ती तिची बहीण शबनूरच्या हुसेनाबादेतील दिल्ली गेटच्या घरी गेली.
- पाकिस्तानातील बहिणीनं मागितला संपत्तीत वाटा : भारतात आलेली उजमा बुधवारी रात्री उशीरा श्यामनगर इथल्या आसिमच्या घरी गेली. यावेळी तिनं भावाच्या संपत्तीत वाटा मागितला. यावरुन दोघा बहीण भावात वाद झाला. नागरिकांनी समजूत काढल्यावरुन तिनं तिचं कोतवाली इथलं जुनं घर गाठलं. मात्र आसिमनं उजमापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला.
मुलांचं अपहरण करुन ठार मारण्याची धमकी : आसिमनं लिसाडीगेट पोलीस ठाण्यात बहीण उजमा हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संपत्ती न दिल्यानं बहीण ठार मारण्याची आणि मुलांचं अपहरण करण्याची धमकी देत आहे, असा आरोप आसिमनं केला आहे. त्याचे वडील कासिम यांनी मृत्यूपूर्वी सर्व भावंडांमध्ये संपत्तीची समान वाटणी केली. त्यानंतर उजमा आपली संपत्ती विकून पाकिस्तानात गेली. ज्या घरात तो कुटुंबासह राहत आहे, ते घर त्यानं स्वत:च्या मेहनतीनं विकत घेतलं. त्यामुळे उजमाचा त्यावर कोणताही हक्क नाही, असा आसिमचा दावा आहे. मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर लिसाडीगेट चौकीचे प्रभारी मोहम्मद कासिम यांनी भावा-बहिणींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा :