ETV Bharat / bharat

अंडरवर्ल्ड डॉन दाऊ अन् हाफिज सईदला भारताकडे कधी सोपवणार या प्रश्नावर एफआयए संचालकांचे मौन

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद यांना भारताकडे सोपवणार का?, असे विचारले असता दिल्लीतील इंटरपोल परिषदेत सहभागी होणारे पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसिन बट्ट यांनी काहीही उत्तर दिले नाही.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Oct 18, 2022, 8:58 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान सरकार मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यांना भारताच्या ताब्यात कधी देणार? इंटरपोलच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आलेल्या पाकिस्तानच्या फेडरल एजन्सीच्या (एफआयए) संचालकांनी या प्रश्नावर मौन बाळगले. भारतासोबतच्या प्रत्यार्पण कराराच्या पुढे जाण्याच्या प्रश्नावरही ते काहीही बोलला नाहीत.

  • #WATCH | Pakistan's director-general of the Federal Investigation Agency (FIA) Mohsin Butt, attending the Interpol conference in Delhi, refuses to answer when asked if they will handover underworld don Dawood Ibrahim & Lashkar-e-Taiba chief Hafiz Saeed to India. pic.twitter.com/GRKQWvPNA1

    — ANI (@ANI) October 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

25 वर्षांनंतर भारतात इंटरपोलची आमसभा होत आहे. भारतात शेवटची बैठक 1997 मध्ये झाली होती. दिल्लीतील ही बैठक 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून यामध्ये 195 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आज मंगळवार (दि. 18 ऑक्टोबर)रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध शिकार आणि संघटित गुन्हेगारी हे मानवतेसाठी जागतिक धोका असल्याचे वर्णन केले. या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची वेळ आली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.

मोदी पुढे म्हणाले की, दहशतवाद केवळ भौतिकदृष्ट्या अस्तित्वात नाही, तर आता सायबर धमक्या आणि ऑनलाइन कट्टरतावादाच्या माध्यमातून त्याची व्याप्ती वाढवत आहे. इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांच्या पोलिसांमध्ये समन्वय साधणारी संस्था आहे. या संघटनेत इंटरपोलच्या सदस्य देशांच्या पोलिसांचा समावेश आहे. ही संस्था 1923 पासून कार्यरत आहे. इंटरपोलचे मुख्यालय ल्योन, फ्रान्स येथे आहे.

एनआयएच्या गुप्तचर अहवालानुसार दाऊद टोळीचे लोक पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या दहशतवादी संघटनांना निधी पुरवत आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरात खंडणी, सट्टा, बिल्डरांना धमक्या आणि ड्रग्जचा धंदा वाढला आहे. गेल्या महिन्यात एनआयएने दाऊदवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.