इस्लामाबाद- दहशतवादाचे नंदनवन असल्याचा आरोप होणारा पाकिस्तान बॉम्बस्फोटानं हादरला आहे. उत्तर वझिरीस्तानमधील गुलमीर कोट भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 11 मजूर ठार झालेत. या बॉम्बस्फोटात दोन मजूर जखमी झालेत.
काही आठवड्यापूर्वीच बाजौरमध्ये भीषण आत्मघातकी स्फोटात २३ मुलांसह ६३ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला जमियत उलेमा-ए-इस्लाम या पक्षाकडून करण्यात येणाऱ्या निवडणूक प्रचारारावेळी झाला होता. फझलुर रहमान या नेत्याच्या व्यासपीठाजवळ बॉम्बस्फोट झाल्यानंतर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच पाकिस्तानमध्ये हा दुसरा बॉम्बस्फोट झाल्याने नागरिकांची चिंता वाढलीयं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (टीटीपी) यांच्यातील युद्धविराम संपल्यानंतर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र, यात तेथील सर्वसामान्य जनता दहशतवादी हल्ल्यात सातत्याने भरडून निघत आहे.
सात महिन्यांत 200 लोकांचा मृत्यू- जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2023 मध्ये जुलैपर्यंत पाकिस्तानमध्ये एकूण 18 आत्मघाती हल्ले झाले. यात 200 लोकांचा मृत्यू झाला. तर 450 हून अधिक जण जखमी झाले. दहशतवादी हल्ल्यांत वाढ होत असताना पाकिस्तान सरकारकडून दहशतवाद्यांबरोबर पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी टीका केली. जनरल असीम मुनीर म्हणाले, दहशतवाद्यांशी चर्चा करण्याचे प्रयत्न आहेत.
कशी आहे पाकिस्तानात स्थिती?- पाकिस्तानमध्ये महागाईचे प्रमाण प्रचंड वाढले असताना सरकार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत येत्या काही महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार असताना कमालीची राजकीय अस्थिरता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची तातडीने तुरुंगात रवानगी करण्यात आली.
पाकिस्तानमध्ये कमालीची राजकीय अस्थिरता - पाकिकस्तानच्या पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू तोशखान्यात ठेवल्या जातात. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी कारकिर्दीत तोशखान्यात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू विकून 14 कोटी रुपये मिळविल्याचा आरोप आहे. तोशखान्यात पाकिस्तानातील बडे नेते, सेलिब्रिटी, नोकरशहा, अधिकारी आणि इतर देशांनी दिलेल्या भेटवस्तू असतात. या भेटवस्तू पाकिस्तान सरकारच्या मालकीच्या असल्याने त्याची विक्री करता येत नाही. इम्रान खान तुरुंगात असताना काळजीवाहू खासदार अन्वर उल हक काकर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
हेही वाचा-