ETV Bharat / bharat

Mumbai Attack 2008 : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीरला अटक? १५ वर्षांची शिक्षा - लष्कर-ए-तैयबा साजिद मीरला अटक

२००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ( 2008 Mumbai terrorist attacks ) मास्टरमाईंड दहशतवादी साजिद मीर ( Lashkar-e-Taiba Sajid Mir ) याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आल्याचे वृत्त ( Pakistan arrested mastermind ) आहे. मात्र याबाबत अधिकुत माहिती मिळू शकलेली नाही.

Sajid Mir
साजिद मीर
author img

By

Published : Jun 25, 2022, 9:06 AM IST

Updated : Jun 25, 2022, 9:21 AM IST

इस्लामाबाद ( पाकिस्तान ) : पाकिस्तानने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा ( 2008 Mumbai terrorist attacks ) मास्टरमाईंड, लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) दहशतवादी साजिद मीर ( Lashkar-e-Taiba Sajid Mir ) याला एका दशकानंतर अटक केली ( Pakistan arrested mastermind ) आहे. मीरच्या अटकेच्या अफवा ऑनलाइन प्रसारित झाल्या आहेत परंतु, त्याची पडताळणी झाली नाही. दरम्यान, न्यायालयाने त्याला १५ वर्षे शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (Financial Action Task Force ) च्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या वॉचलिस्टमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. देशातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी मापदंडांची पूर्तता न केल्यामुळे सध्या पाकिस्तान वॉचडॉगच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये आहे.

लष्कर ए तोयबा ही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेली दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तान अनेक वर्षांपासून मीर याची उपस्थिती नाकारत आहे आणि एकदा तो मेला असल्याचा दावाही केला होता, असे निक्की एशियाने वृत्त दिले आहे. साजिद मीर हा माणूस एफबीआयच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे, त्याच्या डोक्यावर USD 5 दशलक्ष बक्षीस आहे. अनेक वर्षांपासून अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी त्याचा शोध घेतला आहे. मीडिया पोर्टलशी केलेल्या संभाषणात, पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री, हम्माद अझहर म्हणाले की, पाकिस्तानने मीर आणि इतर दहशतवाद्यांविरोधात उपाययोजना केल्या. ज्या FATF साठी समाधानकारक होत्या. शिवाय, निक्की एशियाशी बोलताना एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मीर पाकिस्तानमध्ये "जिवंत, कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे".

या प्रकरणाची माहिती असलेल्या आणखी एका माजी पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, "पाकिस्तानींनी भारत आणि अमेरिका या दोघांनाही कबूल केले आहे की साजिद मीर नावाचा एक व्यक्ती, जो मुंबई हल्ल्यांशी संबंधित होता, आणि ज्याला पाकिस्तानने फार पूर्वीपासून म्हटले होते की तो त्यांना सापडला आहे." मुंबई हल्ल्याला पाकिस्तानने दिलेली प्रत्युत्तराची मालिका उलट-सुलट होत आहे. पूर्वीच्या यूएस अहवालानुसार, दहशतवादविरोधी आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड जसे की जैश-ए-मोहम्मद (जेईएम) संस्थापक मसूद अझहर आणि एलईटीचा साजिद मीर यांसारख्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात पाकिस्तान पुरेशी पावले उचलण्यात अयशस्वी ठरला आहे.

न्यायालयाने सुनावली १५ वर्षांची शिक्षा : पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी १५ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाचा सदस्य साजिद मजीद मीर याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावा नेत्यांच्या दहशतवादासाठी वित्तपुरवठा प्रकरणे हाताळणाऱ्या एका वरिष्ठ वकिलाने शुक्रवारी वृत्तसंस्थेला सांगितले, "या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर-ए-दावावर बंदी घातली होती. साजिद मजीद मीर, तैयबाशी संबंधित असलेल्या आरोपीला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : दहशतवाद्यांचे लाड पाकिस्तानला भोवले.. FATF ने दिला मोठा झटका.. 'ग्रे' लिस्टमध्येच राहणार

Last Updated : Jun 25, 2022, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.