ETV Bharat / bharat

पद्म विभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी मुलीच्या मृत्यूनंतर केली न्यायाची मागणी - पंडित छन्नूलाल मिश्रा न्याय मागणी

पद्म विभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या मोठ्या मुलीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.

Padma Vibhushan Pandit Channulal Mishra
पद्म विभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा
author img

By

Published : May 5, 2021, 10:03 PM IST

वाराणसी (युपी) - पद्म विभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या मोठ्या मुलीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.

पद्म विभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा

मिळालेल्या माहितीनुसार, मिश्रा यांच्या धाकट्या मुलीने वाराणसीतील एका रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप करत तक्रार केली होती. गेल्या वर्षी मिश्रा यांच्या पत्नीचा वाराणसीतील गुरुधाम भागातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर १ मे रोजी त्यांच्या मोठ्या मुलीचा देखील जिल्ह्यातील मेडवीन रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णालयाकडून तिच्या मृत्यूविषयी कुठलीही माहिती देण्यात आली नाही किंवा सीसीटीव्ही व्डिडिओ देखील दिला नसल्याच्या आरोप होत आहे. यामुळे मिश्रा यांच्या छोट्या मुलीने रुग्णालयाविषयी तक्रार दाखल केली.

मिश्रा यांच्या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर वाराणसी जिल्हा प्रशासनाने एक वैद्यकीय चौकशी समितीची स्थापना केली असून ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.