ETV Bharat / bharat

राजस्थान : अक्षम्य दुर्लक्षपणा! रेल्वे मालगाडीमधील ऑक्सिजन टँकरला गळती - रेल्वे मालगाडी ऑक्सिजन टँकर गळती

देशभरात अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा न झाल्याने रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा स्थितीत रेल्वेकडून ऑक्सिजन टँकरची वाहतूक होताना निष्काळजीपणा होत असल्याचे समोर आले आहे.

oxygen leaked through tanke
ऑक्सिजन टँकरला गळती
author img

By

Published : May 6, 2021, 3:43 PM IST

नवी दिल्ली - देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा वेगवान आणि सुरळितपणे करण्यासाठी रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. मात्र, रेल्वेकडून वाहतूक होणाऱ्या ऑक्सिजन टँकरमधून गळती होत असल्याचा व्हिडिओ आज समोर आला आहे. ही घटना राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शनवर घडली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनची गळती सुरू असताना रेल्वे वेगाने धावत होती.

देशभरात अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा न झाल्याने रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा स्थितीत रेल्वेकडून ऑक्सिजन टँकरची वाहतूक होताना निष्काळजीपणा होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही दिसून आला आहे. एकीकडे ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. तर दुसरीकडे ऑक्सिजनची गळती होताना निष्काळजीपणा दिसत आहे. सुत्राच्या माहितीनुसार ही मालगाडी ऑक्सिजन टँकर घेऊन अहमदाबादला जात होती.

रेल्वे मालगाडीमधील ऑक्सिजन टँकरला गळती

हेही वाचा-गुरुग्राम : आयसीयूमध्ये मृत कोरोना रुग्णांना सोडून डॉक्टर फरार; सहा दिवसांनंतरही कारवाई नाही

आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेकडून ऑक्सिजन टँकरची वाहतूक

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. त्यामुळे विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात येत आहे. लांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस 2 दिवस तर रस्त्यामार्गे 3 दिवस लागतात. या टँकरच्या वेगवान वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आले आहेत. रेल्वेने गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. त्यामधून पुरवठा साखळी सुरळित ठेवली होती.

हेही वाचा-'आसाराम'ला कोरोनाची लागण; तुरुंगातून आयसीयूमध्ये हलवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.