ETV Bharat / bharat

OXFAM अहवाल : कोरोना महामारीनंतर उपासमारी सहा पटीने वाढली

author img

By

Published : Jul 11, 2021, 9:44 AM IST

कोरोना पेक्षा उपासमार जास्त घातक ठरू शकते, असा इशारा वर्ष 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमने आपल्या 'द हंगर व्हायरस' या अहवालात दिला होता. यावर्षी अन्नधान्याच्या असुरक्षिततेचा सामना 2 कोटी लोकांना करावा लागत आहे. कोरोना महामारीची सुरूवात झाल्यापासून, दुष्काळसदृश परिस्थितीत जगणार्‍या लोकांची संख्या सहा पट वाढून 5,20,000 पेक्षा जास्त झाली आहे.

OXFAM अहवाल
OXFAM अहवाल

नवी दिल्ली - कोविड आणि हवामान संकटामुळे दर मिनिटाला 11 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या महामारीतील मृत्यूच्या तुलनेत हा दर जास्त आहे, असे ऑक्सफॅम अहवलात म्हटलं आहे. कोरोना पेक्षा उपासमार जास्त घातक ठरू शकते, असा इशारा वर्ष 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमने आपल्या 'द हंगर व्हायरस' या अहवालात दिला होता. यावर्षी अन्नधान्याच्या असुरक्षिततेचा सामना 2 कोटी लोकांना करावा लागत आहे. कोरोना महामारीची सुरूवात झाल्यापासून, दुष्काळसदृश परिस्थितीत जगणार्‍या लोकांची संख्या सहापट वाढून 5,20,000 पेक्षा जास्त झाली आहे.

उपासमारी तीव्र पातळीवर गेली आहे. इथिओपिया, मेडागास्कर, दक्षिण सुदान आणि येमेनमध्ये दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड देणार्‍या लोकांची संख्या 5,21,814 पर्यंत पोहोचली आहे. 2021 च्या अखेरीस अत्यंत गरीबीत राहणाऱया लोकांची अंदाजे संख्या 745 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. महामारीचा प्रसार झाल्यापासून यात 100 मिलियनची वाढ झाली आहे. 2.7 बिलियन लोकांना महामारीत निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक आर्थिक मदत मिळालेली नाही.

यावर्षी जागतिक उपासमारीचे तिसरे महत्त्वपूर्ण कारण हवामान संकट होते. विक्रमी वादळ आणि पूर यासह सुमारे 400 हवामान आपत्तींचा मध्य अमेरिका, दक्षिणपूर्व आशिया आणि हॉर्न ऑफ आफ्रिका मधील कोट्यावधी लोकांना त्रास झाला. उपासमार संपविणे शक्य आहे. युद्धामध्ये सामील असलेल्या पक्षांनी प्रथम शांतता प्रस्थापित केली पाहिजे. सामाजिक संसाधने आणि असुरक्षित लोकांच्या गरजा भागविणार्‍या आणि जीव वाचविणाऱया कार्यक्रमांवर सरकारांनी त्यांचे स्रोत केंद्रित केले पाहिजे.

उपासमारीचे संकट संपवण्यासाठी कोरोनानंतर सुस्पष्ट आणि अधिक शाश्वत जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा निर्माण करावी लागेल. उपासमारीची प्रमुख कारणे सोडविली पाहिजेत आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर वाढविणारी मूलभूत असमानता दूर केली पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.