नवी दिल्ली - भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) रविवारी पद सोडण्याच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या सचिवालयाने ही माहिती दिली आहे. त्यांचा संदेश ऑल इंडिया रेडिओ (AIR) च्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर सात वाजता प्रसारित केला जाईल आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल. विरोधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांची शुक्रवारी भारताच्या पुढील राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्या सोमवारी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतील.
द्रौपदी मुर्मू यांना सोमवारी शपथ - सोमवारी त्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेणार आहेत. 64 वर्षीय मुर्मू या खूप मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. रामनाथ कोविंद यांच्या जागी त्या देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून सुत्रे हाती घेतील. आदिवासी समाजात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपदी पदावर विराजमान होणाऱ्या देशातील पहिल्या महिला असतील. मुर्मू 25 जुलै रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे आणि विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.
विरोधकांचीही मते मुर्मू यांना - मुर्मू यांच्या उमेदवारीमुळे विरोधी पक्षातही फूट पडली. झारखंडमधील JMM पक्षाने त्यांच्या आदिवासी असण्यामुळे त्यांना पाठिंबा दिला. इतर काही आदिवासी खासदार आणि आमदारांनीही पक्षाच्या विरोधात जाऊन करता त्यांना मतदान केले.
अमृत महोत्सवी वर्षातील ऐतिहासिक घटना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुर्मू यांचे अभिनंदन करताना ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भारत इतिहास आहे. 130 कोटी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत असताना पूर्व भारतातील दुर्गम भागात जन्मलेल्या आदिवासी समाजातील भारताच्या मुलीची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचे अभिनंदन. प्रतिभा पाटील यांच्यानंतर राष्ट्रपती बनणाऱ्या मुर्मू या दुसऱ्या महिला असतील. ओडिशातील संथाल जमातीशी संबंधित, त्या राज्यातील मयूरभंज भागातील त्या आहेत.
हेही वाचा - Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक