हैदराबाद: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात आता पुढे काय होणार कोण बाजी मारणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 50 पेक्षा जास्त आमदारांचा गट घेऊन शिवसेनेतील वजनदार नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. त्यांच्या गटात सुरवातीला सहभागी न झालेले तसेच शिवसेनेच्या मेळावे आणि बैठकांना उपस्थित असलेले दुसरे वजनदार नेते उदय सामंत हे पण नंतर शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे गटाचे नेमके काय म्हणने आहे त्यांच्या काय भावणा आहेत. सगळ्या घडामोडींकडे ते कसे पाहत आहेत. या संदर्भात ई टिव्ही भारत ने त्यांच्याशी केलेली खास बातचित...
- शिंदे गटाचा लढा सुरु आहे यावर काय सांगाल?
- सगळ्यात आधि मला हे स्पष्ट करायचे आहे की, आम्हाला कोणी बंडखोर म्हणत आहे. कोणी गद्दार ठरवत आहे त्याचा मी जाहिर निषेध करतो. कारण आम्ही येथे शिवसैनिक म्हणुनच आलेलो आहोत. आमची मोहीम काय आहे हे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेले आहेच. आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे किंवा उध्दव ठाकरे यांचे विचार डावलण्यासाठी किंवा आहे त्या पेक्षा काही मोठे मंत्री पद हवे आहेत यासाठी आम्ही इथे आलेलो नाहीत. आमची वयक्तिक कोणतीही मागणी नाही.
- शिंदे गटाचा लढा नेमका कशासाठी आहे?
- आम्ही आजही शिवसेनेतच आहोत आमची नाराजी वंदनीय बाळासाहेब किंवा उध्दव ठाकरे यांच्यावर कधिच नाही. आमची नाराजी आमच्या सोबत राहुन आमचा पक्षाला डुूबवणाऱ्या घटक पक्षांवर आहे. उध्दव ठाकरे हे भावनात्मक माणुस आहेत ते तसे राजकारणी नाहीत. आमचे घटक पक्ष आमच्या सोबत राहुन त्यांचा फायदा करुन घेत आहेत. त्यांचा फायदा कसा घेतला जात होता ते एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले त्यांनी पक्षाला घटकपक्षांच्या विळख्यातुन बाहेर काढण्यासाठी ही मोहिम आखली आहे.
- घटक पक्षांकडून नेमका कोणता त्रास शिवसेनेला झाला?
- राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत काय झाले सगळयांनी पाहिले आहे. दोन वर्षा पुर्वी झालेल्या निवडणूकीत काय झाले काॅंग्रेस राष्ट्र्वादी काॅंग्रेसचे दोन दोन उमेदवार निवडून आले १ अपक्ष निवडून आला तो आठव्या दिवशी काॅंग्रेसला जाऊन मिळाला. महाविकास आघाडी म्हणुन कोल्हापुरात एकत्र निवडणूक लढवली तेथे काॅंग्रेसचा उमेदवार निवडूण आला आता तो मतदारसंघ त्यांचा झाला. छत्रपती संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवार द्यावा हा प्रस्ताव घेउन मी राजेंंकडे गेलो होतो ते शिवसेनेत आले नाहीत तेथे संजय पवार सारख्या शिवसैनिकाला तिकीट देण्यात आले त्याला राज्यसभेत जाण्यापासून रोकण्याचे काम कोणी केले. अशा किती घटना आहेत.
- पण आपल्यावर म्हणजे शिंदे गटात जाणाऱ्यांवर आरोप होत आहेत?
- हो मी पण एैकले म्हणे आम्हाला 50 कोटी रुपये मिळाले आरोप करणाऱ्यांनी 50 कोटी मधे 50 च्या पुढे किती शुन्य असतात हे सांगावे आम्हाला आनंद होईल ज्यांना यातील काही माहित नाही त्यांनी खर म्हणजे यावर बोलु नये. आम्हाला येवढे मिळाले म्हणुन आम्ही इकडे आलो हे पुराव्यानिशी कोणी सिध्द केले तर मी पुन्हा राजकारणात पाय ठेवणार नाही. काही लोक जाणुन बुजुन असा प्रचार करत आहेत. मी म्हणालोच आहे की त्यांना आमची भुमिकाच कळलेली नाही उलट गेले तर जाऊद्या अशा प्रकारचे त्यांचे धोरण आहे.
- तुम्हीपण शिंदे गटात सगळ्यात नंतर दाखल झालात ?
- हो मी पण इकडे नंतर आलो. असे घडू नये याच मताचा मी होतो. मी तर जाहिर पणे भुमिका मांडली होती. चर्चेतुन मार्ग निघावा अशी माझी भुमिका होती. मी तर बैठकांना हजर होतो. पण या प्रकरणात जोडण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. उलट गेलेल्यांना बंंडखोर ठरवले गेले त्यांचे म्हणने अैकले नाही. गेले तर बरेच झाले. आता राहिलेल्यांना आम्हाला संधी मिळेल असे वाटू लागले आहे. तेथे या प्रकरणात जोडण्याचे काहीही प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे यावे लागले कारण इथे सगळे याच विचाराचे आहेत.
- सत्ता संघर्षातील पुढचा अंक काय असेल ?
- पुढचा अंक काय असेल या पेक्षा आम्हाला तुमच्या माध्यमातुन जनतेला सांगायचे आहे की, आम्ही म्हणजे एकनाथ शिंदे आणि इथे असलेले सगळे आमदार उद्धव ठाकरे यांन सुसंस्कृत नेता मानताे. पण घटक पक्षांच्या बाबतीत आमच्या सगळ्य्यांचे एकमत आहे. आम्हाला ही अनैसर्गिक युती नको आहे. नैसर्गिक युती आम्हाला हवी आहे असे आम्हाला सांगायचे आहे. घटक पक्षांनी शिवसेनेची गळचेपी केली आहे. आम्हाला पक्षाला घडक पक्षाच्या विळख्यातुन बाहेर काढायचे आहे.