ETV Bharat / bharat

Margaret Alva Files Nomination : विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वांनी भरला उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज - अल्वा न्यूज़

उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा ( opposition candidate Margaret Alva ) यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल ( Margaret Alva filed her nomination ) केला. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, अल्वा यांच्या उमेदवारी प्रसंगी तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा एकही नेता पोहोचला नाही.

Margaret Alva Files Nomination
मार्गारेट अल्वांनी भरला उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज
author img

By

Published : Jul 19, 2022, 3:41 PM IST

नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा ( opposition candidate Margaret Alva ) यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल ( Margaret Alva filed her nomination ) केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा, द्रमुक नेते तिरुची सिवा आणि एमडीएमके नेते वायको हेही उपस्थित होते.

अल्वा यांच्या उमेदवारी प्रसंगी तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा एकही नेता पोहोचला नाही. अल्वा यांना विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीतही हे दोन्ही पक्ष उपस्थित राहिले नाहीत. पवार यांनी मात्र आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते.

विरोधी पक्षांनी रविवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमचा उमेदवार म्हणून घोषित केले. त्यांचा सामना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखर यांच्याशी आहे. धनखर यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. अल्वा यांच्या उमेदवारी संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली.

बैठकीनंतर 80 वर्षीय अल्वा यांनी ट्विट केले होते की, "ही निवडणूक कठीण असेल यात शंका नाही, परंतु मी कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही. माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते." असेही त्या म्हणाल्या होत्या. "मला माहित आहे की ही एक कठीण लढत आहे, परंतु राजकारणात विजय किंवा पराभव हा मुद्दा नसतो, मुद्दा हा लढा असतो." उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज १९ जुलै आहे.

हेही वाचा : Oppositions VP Candidate Margaret Alva : उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा भरणार उमेदवारी अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.