ETV Bharat / bharat

Opposition unity on Presidential polls in jeopardy : राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या ऐक्याला धोका, ममतांची वेगळी बैठक - ममता बॅनर्जी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप विरोधकांना एकत्र करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होत आहे. मात्र, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 15 जूनला विरोधी पक्षांना चर्चेसाठी बोलाविले आहे. त्यामुळे विरोधकांच्या ऐक्यात खोडा घातला जाण्याची शक्यता आहे. विरोधकांमध्ये पडणारी अशी संभाव्य फूट भाजपच्या पथ्यावर पडू शकते.

Mamata Banerjee
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jun 13, 2022, 4:35 PM IST

कोलकाता-दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप विरोधकांना एकत्र करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होत आहे. मात्र, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 15 जूनला विरोधी पक्षांना चर्चेसाठी बोलाविले आहे. त्यामुळे विरोधकांच्या ऐक्यात खोडा घातला जाण्याची शक्यता आहे. विरोधकांमध्ये पडणारी अशी संभाव्य फूट भाजपच्या पथ्यावर पडू शकते. यासंदर्भात त्यांनी विरोधी पक्षांना एक पत्र लिहिले आहे.

विरोधकांना लिहिले पत्र - देशातल्या 22 प्रादेशिक पक्षांना ममता बॅनर्जी यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात ममता यांनी म्हटले आहे की, मजबूत लोकशाही चारित्र्य असलेल्या राष्ट्राला मजबूत आणि प्रभावी विरोधी पक्षाची आवश्यकता असते. त्यामुळे सर्व पुरोगामी विचाराच्या विरोधकांनी फुटीरतावादी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी एकत्र यायला हवे. विविध केंद्रीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत आहे आणि देशांतील वातावरण गढूळ होत आहे.

काँग्रेसच्या प्रयत्नांना खो - डाव्या पक्षांसहित अन्य पक्षांशी काँग्रेसने चर्चा करण्याचे ठरविले आहे. मात्र, त्याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपली ही बैठक बोलाविली आहे. त्यामुळे विरोधकांची एकजून निर्माण होणे अवघड होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरविताना काँग्रेस विरोधकांचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात असतानाच काँग्रेसच्या बैठकीत ममता बॅनर्जींच्या पक्षाकडून कोणताही प्रतिनिधी जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

सर्वमान्य उमेदवाराबाबत शंका - विरोधी ऐक्याला धोका निर्माण करणारी परिस्थिती टाळण्याचे प्रयत्न सुरू असले तरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वमान्य विरोधी उमेदवाराबाबत फारसे संकेत मिळत नाहीत. ममतांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ममता यांनी बोलाविलेली बैठक ही एकतर्फी आहे. यासाठी त्यांनी आमच्या सल्लामसलतही केली नाही. विरोधकांचा एकच उमेदवार असावा असे आम्हालाही वाटते, परंतु त्यासाठी एकमत व्हायला हवे.

हेही वाचा - राहुल के समर्थन में कांग्रेस का प्रदर्शन, स्मृति ईरानी ने पूछे सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.