ETV Bharat / bharat

Opposition Joint Statement : भाजपा नेत्यांच्या Hate Speech संदर्भात काँग्रेससह 13 विरोधीपक्षांनी जारी केले संयुक्त निवेदन - India communal clashes Opposition Statement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्वेषपूर्ण ( Hate Speech ) भाषणाविरोधात भूमिका घेण्यापासून काय थांबवते आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ( Congress President Sonia Gandhi ) विचारला आहे. एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लेखानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन, जेएमएम प्रमुख हेमंत सोरेन, आरजेडी प्रमुख तेजस्वी यांच्यासह 13 विरोधीपक्षांनी ( Opposition Leaders Issue Joint Statement ) एक संयुक्त निवेदन जारी केले आहे.

Sonia Gandhi Hate Speech Article
Sonia Gandhi Hate Speech Article
author img

By

Published : Apr 16, 2022, 8:27 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्वेषपूर्ण ( Hate Speech ) भाषणाविरोधात भूमिका घेण्यापासून काय थांबवते आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ( Congress President Sonia Gandhi ) विचारला आहे. एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी म्हणाल्या की, 'सण साजरे करणे, विविध धर्माच्या समुदायांमधील चांगले संबंध हे आपल्या समाजाचे फार पूर्वीपासून अभिमानास्पद वैशिष्ट्य आहे. याचा वापर संकुचित राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. तसेच ही ऐकी कमजोर करणे म्हणजे भारतीय समाज आणि राष्ट्रीयत्वाचा एकंदर आणि एकसंध पाया खराब करणे होय, असंही त्या म्हणाल्या. रामनवमीनंतर देशात अनेक ठिकाणी झालेल्या जातीय संघर्ष, हिजाब आणि अजानशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टिप्पणी केली आहे.

आर्थिक विकासाला धक्का - भारताला कायमस्वरूपी उन्मादाच्या स्थितीत ठेवण्याची ही योजना आहे. हे भारतीय समाजासाठी अधिक घातक आहे. सत्तेत असलेल्यांच्या विचारसरणीला विरोध करणारे विचार दाबले जात आहेत. राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जाते आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत पंतप्रधानांकडून बरीच चर्चा होत आहे. परंतु कटू वास्तव हे आहे की, आपल्या समाजाला शतकानुशतके परिभाषित केलेल्या विविधतेचा उपयोग त्याच्या राजवटीत आपल्याला विभाजित करण्यासाठी केला जात आहे. सामाजिक उदारमतवादाचे बिघडलेले वातावरण आणि धर्मांधता, द्वेष आणि विभाजनाचा प्रसार यामुळे आर्थिक विकासाचा पायाच डळमळीत होत असल्याची टिप्पणी करत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

चिंता व्यापक आणि खरी - द्वेषयुक्त भाषण कोणीही केले तरीही पंतप्रधानांना स्पष्टपणे आणि सार्वजनिकपणे द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध भूमिका घेण्यापासून रोखणारे काय आहे? असा प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. कॉर्पोरेट जगतातील काही धाडसी लोक कर्नाटकात जे काही चालले आहे त्याविरोधात बोलत आहेत, यात आश्चर्य नाही. या धाडसी नागरिकांविरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

13 विरोधी पक्षाचे संयुक्त निवेदन - दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लेखानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन, जेएमएम प्रमुख हेमंत सोरेन, आरजेडी प्रमुख तेजस्वी यांच्यासह 13 विरोधीपक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनात जातीय हिंसाचार आणि द्वेषपूर्ण भाषणाच्याविरोधात पंतप्रधान मोदींच्या मौन भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • Opposition leaders including Sonia Gandhi, Sharad Pawar, Mamata Banerjee, MK Stalin, Hemant Soren, Tejashwi Yadav and others issue joint appeals to people to maintain peace and harmony and demand stringent punishment for perpetrators of communal violence pic.twitter.com/o4AnWlR9Gy

    — ANI (@ANI) April 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशातील द्वेषपूर्ण भाषणाच्या वाढत्या घटनांबद्दल आम्ही चिंतित आहोत. देशातील अनेक राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो. ज्या भागात या घटना घडल्या आहेत त्या भागात एक भयावह स्थिती असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, असेही या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - Sonia Gandhi meets Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्याबरोबर सोनिया गांधींची बैठक, गुजरात निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.