तेल अवीव Operation Ajay : हमास आणि इराकमध्ये युद्ध सुरू असल्यानं तिथे अडकलेल्या भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत भारतीयांना दिलासा देण्यासाठी ऑपरेशन अजय ही मोहिम भारत सरकारनं हाती घेतलीय. इस्रायलमधील तेल अवीव येथून चौथं विमान शनिवारी रात्री उशिरा भारतासाठी रवाना झाल्याची माहिती पररराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पुर्वीचं ट्विटर) दिलीय.
-
#OperationAjay
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2nd flight of the day departs from Tel Aviv carrying 274 passengers. pic.twitter.com/UeRQGhamuN
">#OperationAjay
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 14, 2023
2nd flight of the day departs from Tel Aviv carrying 274 passengers. pic.twitter.com/UeRQGhamuN#OperationAjay
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 14, 2023
2nd flight of the day departs from Tel Aviv carrying 274 passengers. pic.twitter.com/UeRQGhamuN
आतापर्यंत किती नागरिक भारतात : परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, इस्रायलहून भारतासाठी रवाना होणारी ही एका दिवसातील दुसरी फ्लाइट आहे. यापुर्वी या ऑपरेशनचं तिसरं विमान शनिवारी रात्री उशिरा इस्रायलहून दिल्ली विमानतळावर पोहोचलं. या विमानात 197 भारतीय नागरिक होते. त्यांना इस्रायलमधून सुखरूप परत आणण्यात आलंय. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 644 लोकांना इस्रायलमधून भारतात आणण्यात आलंय.
-
The third flight of #OperationAjay has departed from Tel Aviv to Delhi 🛫🌍. Embassy wishes everyone on board a safe journey. 🇮🇳@MEAIndia pic.twitter.com/6HD3Dzjshu
— India in Israel (@indemtel) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The third flight of #OperationAjay has departed from Tel Aviv to Delhi 🛫🌍. Embassy wishes everyone on board a safe journey. 🇮🇳@MEAIndia pic.twitter.com/6HD3Dzjshu
— India in Israel (@indemtel) October 14, 2023The third flight of #OperationAjay has departed from Tel Aviv to Delhi 🛫🌍. Embassy wishes everyone on board a safe journey. 🇮🇳@MEAIndia pic.twitter.com/6HD3Dzjshu
— India in Israel (@indemtel) October 14, 2023
काय आहे ऑपरेशन अजय : इस्रायलमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन अजय सुरू केलंय. यासाठी गुरुवारपासून इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांनी नोंदणी सुरू केलीय. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत तीन विमानं भारतात दाखल झाली आहेत. तर चौथं विमान काल रात्री उशिरा इस्रायलमधील तेल अवीव येथून भारतासाठी रवाना झालंय.
- युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू : इस्रायल- पॅलेस्टाईनच्या युद्धाला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. यात आतापर्यंत 1300 हून अधिक इस्रायली मारले गेले आहेत. तर इस्रायलनं दिलेल्या चोख प्रत्युत्तरात 1000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
- भारतीयांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन : हमास आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष पाहता परराष्ट्र मंत्रालयानं 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केलाय. हे नियंत्रण कक्ष भारतीयांना माहिती आणि सहाय्य प्रदान करण्यात मदत करत आहे.
हेही वाचा :
- Operation Ajay : 'ऑपरेशन अजय' अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना केलं 'एअरलिफ्ट', पहिलं विमान दिल्लीत दाखल
- Operation Ajay : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं उचललं मोठं पाऊल
- Israeli Consul General Kobbi Shoshani : 'हमासला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवू', इस्रायलच्या काउन्सिल जनरलचा इशारा