तिरुअनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा पुथुपल्ली येथून निघाली आहे. हजारो नागरिक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले असून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ओमन चांडी यांचे मंगळवारी सकाळी बंगळुरू येथे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या पुथुपल्ली येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. येथेच त्यांच्या समर्थकांना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.
पुथुपल्लीतील निवासस्थानी नेण्यात येणार पार्थिव : माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. केएसआरटीसीच्या बसमधून त्यांचे पार्थिव नेण्यात येत आहे. ओमान चांडी यांचे पार्थिव त्यांच्या कौटुंबीक निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. यावेळी विरोधी पक्षनेते व्ही डी साठेसन यांच्यासह काँग्रेसमधील वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
ओमन चांडी घशाच्या आजाराने ग्रस्त : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चांडी यांचे मंगळवारी निधन झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओमन चांडी यांच्यावर बंगळुरुत उपचार सुरु होते. मात्र घशाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ओमन चांडी यांना दिलासा मिळाला नाही. त्यांच्यावर परदेशातही उपचार करण्यात आले होते. दरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बंगळुरुतील रुग्णालयात मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
चंडीच्या शब्दांमुळे पुढे जाण्याची प्रेरणा दिली : नसीर, ओमन चंडी यांची आठवण काढताना म्हणतात की, ते कधीही सामान्य माणसांना भेटण्यास आणि ऐकण्यास तयार असायचे. तत्कालीन विरोधकांनी खोट्या प्रकरणात त्यांची बदनामी केली होती. असे कोणत्याही राजकीय नेत्यासोबत केले जाऊ नये, असे नसीर म्हणतात. नसीर ओमन चंडींवर उपचार सुरू असताना त्यांना अनेकदा भेटायला जायचे. ते सांगतात की, ओमन चंडींच्या शब्दांमुळे त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली. आता ओमेन चंडी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नसीर पुथुपल्ली येथे जाण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा -