ETV Bharat / bharat

Kaziranga National Park : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा सुरू

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने शनिवारी पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा सुरू ( Online ticket booking in Kaziranga National Park ) केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काझीरंगाला भेट देणारे पर्यटक आता नियुक्त पोर्टलद्वारे ई-तिकीट बुक करू ( Book tickets in advance through e portal ) शकतात. यापूर्वी, पर्यटक काझीरंगा येथे पोहोचल्यानंतरच पार्क सफारीसाठी बुकिंग केले जाऊ शकत होते.

author img

By

Published : Oct 16, 2022, 11:13 AM IST

Kaziranga National Park
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

नवी दिल्ली : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने शनिवारी पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा सुरू ( Online ticket booking in Kaziranga National Park ) केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काझीरंगाला भेट देणारे पर्यटक आता नियुक्त पोर्टलद्वारे ई-तिकीट बुक करू ( Book tickets in advance through e portal ) शकतात. यापूर्वी, पर्यटक काझीरंगा येथे पोहोचल्यानंतरच पार्क सफारीसाठी बुकिंग केले जाऊ शकत होते.

ऑनलाइन तिकीट बुकिंग : काझीरंगा येथे पोहोचल्यानंतरच पार्क सफारीसाठी बुकिंग करणे हे त्रासदायक होते अशी तक्रार अनेकदा पर्यकांनी केली होती. ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रियेचे अधिकृत उद्घाटन विभागीय वन अधिकारी (DFO) रमेश कुमार गोगोई यांच्या हस्ते शनिवारी सकाळी मिहिमुख येथे करण्यात आले. स्थानिक आणि परदेशी पर्यटक आता काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या ई-पोर्टलद्वारे आगाऊ तिकीट बुक करून सफारीचा त्रासमुक्त आनंद घेऊ ( Online booking for park safaris ) शकतील. असे गोगोई म्हणाले.

एक शिंगे असलेल्या गेंड्यांसाठी प्रसिद्ध : काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह, जे एक शिंगे असलेल्या गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे, 2 ऑक्टोबरपासून या पर्यटन हंगामासाठी खुले करण्यात आले आहे. तथापि, अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, प्रतिकूल हवामानामुळे पार्क आता कोहोरा आणि बागोरी या दोन श्रेणींमध्ये जीप सफारी सुविधा उपस्थित पर्यटकांना देत आहे.

ब्रह्मपुत्राची वाढती पाणी पातळी : त्याशिवाय "ब्रह्मपुत्रेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे काझीरंगाचा काही भाग अजूनही पाण्याखाली आहे. आम्ही स्थिती पाहत आहोत आणि आशा आहे की नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण उद्यान पर्यटकांसाठी खुले केले जाईल." असे विभागीय वन अधिकारी (DFO) रमेश कुमार गोगोई यांनी संदर्भात म्हटले आहे.

शिंगे गेंड्यासाठी उद्यान प्रसिद्ध : 1985 पासून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या उद्यानाचा समावेश करण्यात आला आहे. एक शिंगे गेंड्यासाठी उद्यान प्रसिद्ध ( Kaziranga famous for one horned rhinoceros ) आहे. एकूण 2,413 गेंडे उद्यानात आहेत. भारतीय हत्ती, जंगली म्हैस आणि दलदलीचा हरिना या उद्यानात भारतीय हत्तींचीदेखील मोठी संख्या आहे. पशु-पक्ष्यांच्या संरक्षणात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान महत्त्वाचे ठरते. हिमालयाच्या पूर्व भागात असलेल्या जैवविविधतेच्या हॉट-स्पॉट्सच्या उपस्थितीमुळे, येथे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये भरपूर विविधता आहे. उद्यानात अनेक लहान जलसाठे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.