नवी दिल्ली- देशभरात कांद्याचं दर वाढत असताना केंद्र सरकारनं कांद्याच्या प्रति टन निर्यातीवर 800 डॉलर निर्यातशुल्क लागू केले. केंद्र सरकार आणखी २ लाख टन कांदा राखीव साठ्याकरिता (buffer stock) खरेदी करणार आहे. यापूर्वीच केंद्र सरकारनं 5 लाख टन राखीव कांदा खरेदी करण्याची घोषणा केली होती.
केंद्र सरकारकडून कांदे दरवाढ नियंत्रणाकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कांदे निर्यातशुल्क लागू केले असले तरी बंगळुरू रोझ, कृष्णपुरम कांदे, कापलेले व पावडरच्या स्वरुपातील कांद्याच्या निर्यातीवर 800 डॉलर शुल्क लागू होणार नाही. कांदे दरवाढ होत असताना एनसीसीएफ आणि नाफेडद्वारे चालविण्यात येणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून ग्राहकांना प्रति 25 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री केली जात आहे. देशभरातील प्रमुख विक्री केंद्रांमध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून बफरमधील कांद्याची विक्री केली जात आहे. यापूर्वी कांद्याच्या राखीव साठ्यामधून 1.70 लाख मेट्रिक टन कांद्याची विक्री करण्यात आली.
कांद्याचा दर सरासरी प्रति किलो 75- घाऊक बाजारपेठेत कमी आवक होत असल्यानं दिल्लीत कांद्याचे दर प्रति किलो 65 ते 80 रुपये किलो आहेत. तर दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याचा दर 67 रुपये प्रति किलो आहेत. ई-कॉमर्स पोर्टल बिगबास्केटमध्ये कांदा 67 रुपये प्रति किलो, मदर डेअरीमध्ये 54 ते 56 रुपये किलो या दरानं कांदा विक्री झाली. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी कांद्याची किरकोळ बाजारपेठेतील किंमत 45 रुपये प्रति किलो राहिली आहे. तर कमाल किंमत 80 रुपये प्रति किलो आहे. दिल्लीत कांद्याचा दर सरासरी प्रति किलो 75 रुपये आहे.
रब्बी हंगामातून कांद्याचे कमी उत्पादन- ज्या राज्यांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत, अशा राज्यांममध्ये केंद्राकडून राखीव साठ्यातील कांदा विक्री केली जात आहे. ऑगस्ट 2023 पासून 22 राज्यांतून सुमारे 1.7 लाख टन कांदा विकण्यात आला आहे. एकीकडं रब्बी हंगामातून कांद्याचे कमी उत्पादन झाले. तर दुसरीकडं खरीप हंगामातील कांद्याची आवक होण्यास उशीर असल्यानं येत्या काही दिवसात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत. अशा स्थितीत बाजारपेठेतील कांद्याचे प्रमाण कमी असता किरकोळसह घाऊक बाजारपेठेतील कांद्याची किंमत वाढली आहे.
हेही वाचा-