ETV Bharat / bharat

Tiger Attack In Bagaha: बगहा येथे वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू, महिन्याभरातील सातवी घटना - man eating tiger

बिहारमधील बगहा येथील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाला (Valmiki Tiger Reserve in Bagaha) लागून असलेल्या भागात सध्या वाघांची दहशत वाढत आहे. वाघाने पहाटे पुन्हा एका तरुणाची शिकार केली आहे.

बगहा येथे वाघाचा हल्ला
बगहा येथे वाघाचा हल्ला
author img

By

Published : Oct 7, 2022, 11:48 AM IST

बगहा: बिहारमधील बगहामध्ये काल रात्री एका वाघाने एका व्यक्तीची शिकार केली (Tiger Hunted Man in Bagaha). हे प्रकरण रामनगर मधील डुमरी (गोबरधन) येथील आहे. संजय महतो (३५ वर्षे) हे शौचासाठी शेतात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. बगहा पंचायतीच्या सिंघाही गावात गुरुवारीच एका नरभक्षक वाघाने (man eating tiger) १२ वर्षांच्या मुलीला ठार मारले होते. गेल्या महिनाभरात वाघाने आतापर्यंत सात जणांना आपली शिकार बनविले आहे. सततच्या पावसामुळे वाघाला पकडण्यात अडचणी येत आहेत. सध्या बगाहातील अनेक भाग जलमय झाले आहेत.

Tiger Attack In Bagaha
बगहा येथे वाघाचा हल्ला

वनविभागाविरोधात नागरिकांमध्ये रोष: संजय महातो शौचासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांची मान मोडली होती आणि वाघाचे दात त्याच्या घशात गेले होते. अतिरक्तस्त्राव आणि श्वासोच्छवास तसेच मान तुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर वनविभागाविरोधात नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. स्थानिक लोकांनी वनविभागाच्या वाहनांची तोडफोड केली. सध्या त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे. नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात एकापाठोपाठ एक मृत्यू होत असल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. 400 वनकर्मचाऱ्यांचे पथक वाघाला पकडण्यासाठी गुंतले आहे. गुरुवारीच एका नरभक्षी वाघाने एका किशोरवयीन मुलाची शिकार केली होती.

बगहा येथे वाघाचा हल्ला

वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू: वाघाने निरपराध व्यक्तीला ठार मारण्याची गेल्या महिन्याभरातील ही 7वी घटना आहे. आतापर्यंत पाच महिन्यांत वाघाने विविध भागात एकूण आठ जणांवर हल्ला केला असून, यातील हा सातवा मृत्यू आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाकडून जोरदार प्रयत्न केले जात असले तरी त्यांना यश येत नाही आहे. नरभक्षक वाघीण ना पकडली जात आहे ना तिचे हल्ले थांबत आहेत.

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण: व्हीटीआर जवळील ग्रामस्थांनी वाघाच्या दहशतीमुळे शेताकडे जाणे बंद केले आहे. वाघ घरापर्यंत पोहोचू नयेत म्हणून घरासमोर शेकोटी पेटवून रात्र काढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सध्या वाघाला शआंत करण्याच्या कामात तज्ञ सफात अली गुंतले आहेत. टीममध्ये सामील असलेल्या लोकांच्या मते सफात अलीचे टार्गेट परफेक्ट आहे. त्यांनी अशा प्रकारच्या लहान प्राण्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांना शांत केलं आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत हत्तीलाही शांत केले आहे. यासोबतच या अभियानात पाटणा प्राणिसंग्रहालयातील व्याघ्रतज्ज्ञांचाही सहभाग आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.