श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील पुलवामाच्या तुज्जन भागात आणि सोपोरच्या तुलिबाल भागात मंगळवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दोन चकमकी झाल्या. सोपोर येथे एका अतिरेक्याला ठार करण्यात आले. काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले की, "एक दहशतवादी ठार. सर्च ऑपरेशन सुरू आहे.
-
#SoporeEncounterUpdate: 01 terrorist killed. #Operation in progress. Further details shall follow.@JmuKmrPolice https://t.co/ZXhXuEKNh6
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#SoporeEncounterUpdate: 01 terrorist killed. #Operation in progress. Further details shall follow.@JmuKmrPolice https://t.co/ZXhXuEKNh6
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 21, 2022#SoporeEncounterUpdate: 01 terrorist killed. #Operation in progress. Further details shall follow.@JmuKmrPolice https://t.co/ZXhXuEKNh6
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 21, 2022
एका पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, तेथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सोपोरमधील तुलिबल गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याने शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले.
पुलवामा येथे झालेल्या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यापैकी एकाचे नाव माजिद नजीर असे आहे, ज्याने यापूर्वी उपनिरीक्षक फारूख मीर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती, असे आयजीपी काश्मीर यांनी सांगितले. दोन्ही ठिकाणी कारवाई सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली.