ETV Bharat / bharat

देशावर आमचे प्रेम आहेच! मात्र, सरकारवर प्रेम असेलच असे नाही; पहा प्रो. झा यांची मुलाखत - ईटीव्ही भारत मराठी

प्राध्यापक आणि राज्यसभा खासदार प्रोफेसर मनोज झा यांच्याशी दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षांच्या वाटचालीबद्दल ईटीव्ही भारतने खास संबाद साधला आहे. (Interview of Professor Manoj Jha on ETV Bharat) त्यांनी दिल्ली विद्यापीठाशी संबंधित अनेक आठवणी आणि वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, दिल्ली विद्यापीठाची व्यापकता ही खूप मोठी आहे. 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्ली विद्यापीठाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रोफेसर मनोज झा यांची खास मुलाखत
प्रोफेसर मनोज झा यांची खास मुलाखत
author img

By

Published : May 1, 2022, 4:05 PM IST

नवी दिल्ली -दिल्ली विद्यापीठ 1 मे रोजी आपल्या स्थापनेचे 100 वे वर्ष शताब्दी उत्सव म्हणून साजरे करणार आहे. 100 वर्षांचा हा प्रवास पूर्ण करताना दिल्ली विद्यापीठाने अनेक चढउतार पाहिले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून आधुनिक भारताचे अनेक आयाम विद्यापीठाने पाहिले आहेत. 1922 मध्ये तीन महाविद्यालये आणि 750 विद्यार्थ्यांसह दिल्ली विद्यापीठाची सुरुवात झाली. (Delhi University completes 100 years) आता त्याची संख्या 90 महाविद्यालये, 6 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि 86 विभागांपर्यंत वाढली आहे. या सर्व परिस्थितीवर प्राध्यापक आणि राज्यसभा खासदार प्रोफेसर मनोज झा यांच्याशी दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षांच्या वाटचालीबद्दल ईटीव्ही भारतने खास संबाद साधला आहे.

प्रोफेसर मनोज झा 'ETV' भारतशी संवाद साधताना

प्राध्यापक मनोज झा म्हणाले की, आज मी जे काही यश मिळवले आहे. जो काही यशाचा टप्पा गाठला आहे, तो केवळ दिल्ली विद्यापीठामुळेच. संवाद हा सातत्यपूर्ण असायला हवा. तसेच, कोणाताही संवाद हा कशा पद्धतीने अखंड चालला पाहिजे हे या विद्यापीठाने आम्हाला शिकवले आहे. (Manoj Jha Dialogue with Etv Bharat) विद्यापीठाला सुंदर इमारतीतून नव्हे तर त्यातील ज्ञानार्जनालाही आपण पाहण्याची गरज आहे अस ते म्हणाले आहेत. तसेच, विद्यापीठाने आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीर व्हायला शिकवले आहे. यावेळी विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगताना ते म्हणाले की, (90)च्या दशकात आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करायचो तेव्हा आम्हाला देशद्रोहात कुणी बंद केले नाही. तसेच, अस काही झाले तर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सायंकाळपर्यंत त्याला सोडून दिले असत अशी आठवणही त्यांनी सांगितली आहे.

1990 ते 2022 या काळात बरेच काही बदलले आहे. कुणी कविता वाचली तरच त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. (Prof. Interview with Jha on ETV India) काही लिहिल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप आहे. याचा फायदा ना आपल्या देशाला होतो ना विद्यापीठाला अशी खंतही मनोज झा यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय विद्यापीठाचे तत्त्वज्ञान जागतिक असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आमचे देशावर प्रेम आहे पण सरकारवर प्रेम असेलच असे नाही, आम्ही सरकारला प्रश्न विचारू असेही ते म्हणाले आहेत. आजकाल ते पूर्णपणे उलट झाले आहे, ही चिंतेची बाब आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

झा म्हणाले की, जिथे सतत संवाद होतो अशी संस्कृती आपल्याला रुजवायची आहे. सध्या विद्यापीठांमध्ये अशा परिस्थितीची वानवा दिसत दिसते असही ते म्हणाले आहेत. भारताला महासागराचे स्वरूप आहे. समुद्राला कधीच तळे व्हायचे नाही. प्राध्यापक मनोज झा म्हणाले की, बदल नैसर्गिक आहे. पण काही बदल होत आहेत. तो भांडवलशाहीला चालना देईल. त्यावर उदाहरण देताना, त्यांनी शैक्षणिक सत्र 2022-23 पासून केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की दिल्ली विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना खूप त्रास होते.

याशिवाय ते म्हणाले की, नवीन नियमामुळे अनेक कोचिंग सेंटर्स सुरू झाली आहेत. अशा स्थितीत या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण शिक्षणाला नव-उदारमतवादी बनवत आहोत का, जिथे खाजगी वसाहत होत चालली आहे, याबाबत आपण आता विचार करण्याची गरज आहे अस स्पष्ट मत त्यांनी नोंदवले आहे. याबरोबरच त्यांनी शिक्षणासाठी काही व्यापक संस्था निर्माण होण्याच्या अपेक्षेने दिल्ली विद्यापीठाच्या बरोबरीनेच अशी विद्यापीठ देशाच्या इतर भागात उभा राहावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. जेणेकरून दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होऊ शकेल.

हेही वाचा - इंधनाचा भडका! मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला 'LPG'च्या दरात 102.50 पैशांची झाली वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.