ETV Bharat / bharat

VIDEO हत्तीच्या कळपासमोर आरडाओरड करणे पडले महागात; कॅमेरासमोरच कामगाराला केले ठार - हत्तीने कामगाराला केले ठार

काही वेळानंतर हत्ती तेथून गेल्यानंतर कामगार तिथे पोहोचले. त्यांनी जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कामगाराला मृत घोषित केले.

On camera Elephant Killed a person
On camera Elephant Killed a person
author img

By

Published : Jul 27, 2021, 6:22 PM IST

Updated : Jul 28, 2021, 11:49 AM IST

नवी दिल्ली - हत्तीने कामगाराला चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील मोरोंगी चहाच्या मळ्यात घडली आहे.

कॅमेरासमोरच कामगाराला केले ठार

चहाच्या मळ्यात काम करून कामगार घरी परतत होते. तेव्हा त्यांना हत्तींचा कळप दिसता. तेव्हा काही कामगारांनी त्या हत्तींचा पाठलाग गेला. तेव्हा एक हत्ती त्यांच्यावर धावून गेला. घाईने पळताना एक कामगार खाली पडला. तेव्हा संतप्त हत्तीने त्याला पायाने तुडविले. काही वेळानंतर हत्ती तेथून गेल्यानंतर कामगार तिथे पोहोचले. त्यांनी जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कामगाराला मृत घोषित केले. अनेक वर्षांपासून आसासममध्ये हत्ती आणि माणसांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून आले आहे.

संबंधित बातमी वाचा-VIDEO : अन् रस्त्यावर आला हत्तींचा कळप; लोकांना पळता भुई थोडी..

1 जूनला हत्तीच्या कळपाने नागरिकांवर केला होता हल्ला

आसाममधील हत्ती आणि लोकांमधील संघर्ष जूनमध्ये वाढत चालला आहे. दर दिवसाआड एखाद्या व्यक्तीवर हत्तीने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. अशातच आता आणखी एक थरारक व्हिडिओ समोर आला होता. राज्याच्या गोलाघाटमध्ये हत्तींचा एक कळप रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. अन्नाच्या शोधात असलेला हा कळप शेतीचे नुकसान करताना दिसून येत आहे, तर नागरिकांनाही त्यामुळे पळता भुई थोडी झाल्याचे दिसत आहे. अखेर काही काळानंतर हा कळप जंगलात गेल्यानंतर परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

संबंधित बातमी वाचा-VIDEO : हत्तींच्या कळपाने केला पर्यटकांवर हल्ला

Last Updated : Jul 28, 2021, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.