भुवनेश्वर : ओडिशामध्ये एका मंत्र्याने कोरोना रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी स्वतःच रुग्णवाहिका चालवल्याचे समोर आले आहे. बारगढ जिल्ह्यातील सोहेलामध्ये ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ताबाडा गावातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. या तरुणाला रुग्णालयात नेण्यासाठी स्वतः मंत्री सुशांत सिंग हे रुग्णवाहिका चालवत त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी या तरुणाला सोहेला रुग्णालयात दाखल केले. यासोबतच त्यांनी सर्व कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही रुग्णालय प्रशासनाला दिले.
यापूर्वीच सुशांत सिंग यांनी सोहेलामध्ये कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एक रुग्णवाहिका दान केली आहे. आता त्यांनी केलेला हा प्रकार पब्लिसिटी स्टंट होता, की खरोखरच सद्भावनेने केलेली कृती हा वेगळा भाग. त्यांच्या या कामगिरीमुळे कोरोना रुग्णांची मदत होत आहे, हेच याठिकाणी पुरेसे आहे.
हेही वाचा : तामिळनाडू : 'द्रमुक'च्या विजयानंतर महिलेने कापली जीभ; देवीला केला होता नवस