त्रिपुरा - कोरोनाच्या रुग्णांची ( Corona Patient ) वाढत असलेली संख्या त्रिपुरा सरकारच्या चिंतेत भर घालीत आहे. यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी त्रिपुरा सरकारने ( Tripura Government ) सोमवारपासून मास्क न घालणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मास्क वापरणे अनिवार्य - रविवारी (17 जुलै) ETV भारतशी बोलताना एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यभरात सोमवारपासून (18 जुलै) नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. “आम्ही सर्व नागरिकांना मास्क घालण्याची विनंती करत आहोत. बाजारपेठा, मॉल्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आवाहन केले जात आहे, परंतु नागरिक प्रशासनाच्या आवाहनाकडे आणि विनंत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. 18 जुलैपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड आकारला जाईल.”
गेल्या एक आठवड्यापासून राज्यभरात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये ( Corona Patient ) वाढ झाली आहे. विशेषत: पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात रुग्ण वेगाने वाढत आहेत. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सरकारने सामान्य लोकांना सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. परंतु निष्काळजीपणे वागत असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येते. दरम्यान, त्रिपुरामध्ये गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे २६० पॉझिटिव्ह रुग्ण ( Corona Patient ) आढळून आले आहेत, ज्याचा पॉझिटिव्ह दर १०.९२ टक्के आहे, तर ३८ जण बरे झाले आहेत.
हेही वाचा - Singapore Open 2022 : फुलराणीचा नवा विक्रम; सिंधूने पहिल्यांदाच पटकावले सिंगापूर ओपनचे जेतेपद