ETV Bharat / bharat

हैतीमधील भूकंपात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ; किमान ७२४ जणांचा मृत्यू - Civilians death Haiti earthquake

हैतीमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संख्येमध्ये रविवारी वाढ झाली. किमान ७२४ नागरिकांचा मृत्यू, तर किमान २ हजार ८०० नागरिक जखमी झाले आहेत.

Civilians death Haiti earthquake
हैती भूकंप नागरिक मृत्यू
author img

By

Published : Aug 16, 2021, 4:21 AM IST

Updated : Aug 16, 2021, 6:54 AM IST

लेस कायेस (हैती) - हैतीमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संख्येमध्ये रविवारी वाढ झाली. किमान ७२४ नागरिकांचा मृत्यू, तर किमान २ हजार ८०० नागरिक जखमी झाले आहेत. हैतीच्या नागरिक संरक्षण कार्यालयाचे संचालक जेरी चँडलर यांनी, बचावकर्ते ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत, असे सांगितले.

हेही वाचा - ...तर आपल्याला चीन पुढे झुकावे लागेल - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

शनिवारी हैतीच्या दक्षिण-पश्चिम भागात जोरदार भूकंप आला होता. या भूकंपाने काही शहरे जवळजवळ उदध्वस्त केली होती. भूकंपाचे केंद्र हे पोर्ट-औ-प्रिन्सच्या राजधानीपासून १२५ कि.मी पश्चिमेला होते, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.

भूकंपाने आधीच नुकसान झाले आहे, त्यात अजून नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णकटिबंधीय वादळ ग्रेस हा हैतीत धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे, देशाला अजून नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे.

भूकंपाने नुकसान झालेल्या लेस कायसमधील काही कुटुंबांनी त्यांचे वाचलेले सामान घेऊन रात्र फूटबॉल पीचवर काढली होती. रविवारी सकाळी नागरिकांनी स्थानिक बाजारात काही उरलेली केळी, अवोकाडोस आणि पाणी विकत घेण्यासाठी रांग लावली होती.

हेही वाचा - #IndiaAt75 : 'सबका साथ-सबका विश्वास, यासोबतच आता 'सबका प्रयास'; मोदींचा नवा नारा

Last Updated : Aug 16, 2021, 6:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.