नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईट टंबलर ( Social networking site Thumblr ) आपली समुदायक मार्गदर्शक तत्त्वे सर्वांसमोर आणली आहेत. ज्यामध्ये ते वेबसाईटवर न्यूड फोटोला ( Nude photos on tumblr ) अनुमती देतील. परंतू सूस्पष्ट प्रतिमांना किंवा फोटोजना परवानगी दिली जाणार आहे. सोशल नेटवर्किंग साइट टंबलने त्यांच्या अधिकृत पोस्टमध्ये हे म्हटले आहे. "आम्ही आमच्या टंबलरया वेबसाईटवर अभिव्यक्ती स्वतंत्र्याला, सर्जनशीलतेला आणि कलेच्या विस्तृत श्रेणीचे स्वागत करतो. ज्यामध्ये मानवी स्वरूप दर्शविणारी सामग्री समाविष्ट असते. त्यात न्यूड फोटोला आणि प्रतिमांना समाविष्ट करण्यात आले आहे.
टंबलर डॅशबोर्ड : अलीकडे, वेबसाईटने वापरकर्त्यांना त्यांच्या टंबलर डॅशबोर्ड अनुभवावर अधिक नियंत्रण देण्यासाठी 'सामुदायीक लेबल्स' सादर केले. या नवीन वैशिष्ट्यासह, वापरकर्ते त्यांना पाहू इच्छित सामग्रीचा प्रकार सेट करून त्यांचे फीड त्यांच्या पसंतीच्या सेक्शनवर टाकता येणार आहे. पोस्टमध्ये पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, तुमच्या निर्मितीमध्ये न्यूडता, लैंगिक फोटो किंवा प्रतिमांचा समावेश असला तरीही, तुम्ही ते आता टंबलवर पोस्ट करू शकता. जेणेकरुन प्रत्येकजण त्यांच्या डॅशबोर्डवर सामग्री पाहू शकतील.
गोष्टींना परवाणगी : याव्यतिरिक्त, कंपनीने नमूद केले आहे की ते अजूनतरी द्वेष पसरवणारे, खोटी माहिती देणारे, हिंसक धमक्या किंवा कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींना परवाणगी देणार नाहीत. स्पष्ट लैंगिक कृत्यांचे फोटो, चित्रण टंबलवर मर्यादित राहतील. त्यात पुढे म्हटले आहे की जर एखाद्या वापरकर्त्याला अशी सामग्री आढळली तर त्यांनी त्याची तक्रार करणे सुरू ठेवावे. जानेवारीमध्ये, टंबलने आयओएस वापरकर्त्यांसाठी अॅप स्टोअरद्वारे सुविधा पुरवण्याची सोय सुरू केली आहे. एक नवीन वैशिष्ट्य 'संवेदनशील सामग्री टॉगल' आणले आहे. या नवीन वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना iOS अॅपवरील संभाव्य संवेदनशील सामग्री म्हणजेच कंटेंट, फोटो निवडण्याची किंवा केलेली निवड रद्द करण्याची परवानगी दिली आहे.