लखनौ - तुम्ही विवाह समारंभात ड्रोनचा वापर केलेला पाहिला असेल. पण, आता ड्रोनचा वापर करून घरपोहोच फूड डिलिव्हरीदेखील केली जाणार आहे. लखनौमधील विद्यार्थ्यांनी असा ड्रोन तयार केला आहे.
लखनौमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले ड्रोन हे कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षम आहेत. लखनौ पब्लिक कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी ड्रोन तयार केले आहेत. कॉलेजचे प्राचार्य म्हणाले, की डॉ. एल. एस. अवस्थी म्हणाले, की हे ड्रोन तयार करण्यासाठी 80 हजार रुपये खर्च झाले आहेत. प्रत्यक्षात अशा ड्रोनची बाजारात सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये किंमत आहे.
हेही वाचा-INDEPENDENCE DAY सहा शौर्य चक्रासहित अन्य पदकांनी सैन्यदलाच्या जवानांचा होणार सन्मान
डॉ. अवस्थी म्हणाले, की हे ड्रोन हे ठराविक क्षेत्रात जाऊन परत मूळ ठिकाणी येतात. या ऑपरेशनवर देखरेख करण्यात येते. येत्या काळात ड्रोनद्वारे मालाचीही वाहतूक करणे शक्य होणार आहे. ड्रोनद्वारे 1 ते 1.5 किलो मालाची वाहतूक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करता येणार आहे. लँचबॉक्स वाहून नेण्यासाठी ड्रोनच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
हेही वाचा-जाणून घ्या, ट्विटरचे काँग्रेससह मोदी सरकारविरोधातील वाद
कॉलेजचे विद्यार्थी रजत आणि अपवायन सिन्हा यांनी हे ड्रोन तयार केले आहे. ड्रोनच्या विकासासाठी सीडबी आणि विद्यार्थ्यांमध्ये करार झाला आहे. ड्रोनच्या व्यावसायिक वापरासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर हे ड्रोन बाजारात उपलब्ध होणार असल्याचे डॉ. अवस्थी यांनी सांगितले. ड्रोनच्या वापरासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नियम लागू केले आहेत. 250 ग्रॅमपर्यंतच्या ड्रोनसाठी परवाना लागत नाही. मात्र, त्याहून अधिक वजनाच्या ड्रोनसाठी परवाना घ्यावा लागतो. विनापरवानगी ड्रोन हवेतून उडविल्यास 25 हजारापर्यंतचा दंड ठोठावण्यात येतो. तर परवानगी नसलेल्या ठिकाणी हवेतून ड्रोन उडविल्यास 50 हजारापर्यंत दंड ठोठावण्यात येतो.
हेही वाचा-जम्मू पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा कट; राममंदिर आणि पाणिपत रिफायनरी होती निशाण्यावर
ड्रोनचे विद्यार्थी रिमोट पायलट आणि रिमोट पायलट लायसन असे दोन प्रकारचे परवाने देण्यात येतात. व्यावसायिक कामासाठी ड्रोन वापरायचा असेल तर किमान 18 वर्षे वयाची अट आहे. तर जास्तीत जास्त 35 वर्षांची आहे. ड्रोन ऑपरेटरचे शिक्षण कमीत कमी दहावी पास असण्याची अट आहे.