उधमपूर (ज.का) - कारगील युद्धातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ भारतीय सेनेने 400 कि.मी ची दुचाकी रॅली काढली आहे. उत्तर आर्मी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडींग इन चीफ योगेश कुमार यांनी गुरुवारी उधमपूर ते कारगिल पर्यंत दुचाकी रॅलीचे नेतृत्व केले.
भारतीय सैन्यातील शूर सैनिकांनी केलेल्या बलिदानाला लक्षात ठेवले जात आहे. जेणेकरून देशातील आजच्या आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया जनरल ऑफिसर कमांडिंग इन-चीफ, उत्तर कमांड आणि कारगिल युद्धाचे हिरो लेफ्टनंट जनरल योगेश कुमार यांनी दिली.
हेही वाचा - कर्नाटकात नेतृत्व बदलाची शक्यता; बीएस येडीयुरप्पा यांच मुख्यमंत्री पद जाणार?
दुचाकी रॅलीच्या माध्यमातून ऑपरेशन विजयदरम्यान हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मरण करणे, तसेच तरुणांमध्ये देशभक्तीची भावना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आहे, असे योगेश कुमार म्हणाले. 7 जुलैला मी एका सुखोईने बत्रा टॉपवरू उड्डाण केले होते. त्या दिवशी माझा एक कंपनी कमांडर कॅप्टन विक्रम बत्रा हा देशासाठी हुतात्मा झाला होता, अशी आठवणही कुमार यांनी यावेळी सांगितली.
या प्रसंगी लेफ्टिनंट जनरल जोशी यांनीही तरुणांना संदेश दिला. जनरल जोशी यांची बटालियन 13 जम्मू आणि काश्मीर राईफल्सने 1999 सालच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानने ताब्यात घेतल्या पहाडांवर हल्ले केले होते आणि युद्धात महत्वाची कामगिरी बजावली होती.
तरुणांनी मोठा विचार करणे, मोठे स्वप्न पाहणे, आणि मोठे होणे हे खूप महत्वाचे आहे. त्यांनी याचे पालन करावे, कुणाची नक्कल करू नये, आपला स्वत:चा मार्ग बनवा आणि दुसाऱ्यांना अनुसरण करण्यासाठी एक निशान ठेवा, असा संदेश लेफ्टिनंट जनरल जोशी यांनी दिला.
विशेष म्हणजे कारगील विजय दिवसाची 22 वी जयंती देखील 1971 च्या युद्धात पाकिस्तानवरील भारताच्या विजयाच्या 50 व्या वर्षाशी मेळ खात आहे. जे सुवर्ण विजय वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक रसत्यातून यात्रा करून विजय मशाल लद्दाख येथे पोहचली आहे. विजय दिवस ला द्रास युद्ध स्मारक येथे विजय मशाल दिली जाईल. या व्यतिरिक्त लष्कराने उत्तर कमांड उधमपूर ते द्रास, युद्ध स्मारक पर्यंत आठवडाभर चालणाऱ्या भव्य सोहळ्याचे नियोजन केले आहे.
सुत्रांनुसार 25 जुलाईला भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे लामुचेन व्यू पॉईंवर होणाऱ्या समारोहामध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद जे सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत, ते 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील आणि कारगिलमधील द्रास युद्ध स्मारक येथे पुष्पहार घालतील, अशी शक्यता आहे.
हेही वाचा - टीएमसीचं 'मिशन गुजरात' : आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार!