पणजी ( गोवा ) - विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपध घेतली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन विभागात भाजप प्रत्येकी दहा अशा 20 जागांवर विजय मिळाला आहे.
उत्तर गोव्यातील किती आमदारांना मंत्रिपद? - उत्तर गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विश्वजित राणे, रोहन खंवटे आणि बाबुश मोन्सरात या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
दक्षिण गोव्यातील किती आमदारांना मंत्रिपद? दक्षिण गोव्याचा विचार केला तर नीलेश कब्राल, रवी नाईक, गोविंद गवाडे, मोविन गुडीनो आणि सुभाष शिरोडकर यांना संधी मिळाली आहे.
यावरुन असे दिसून येते की, भाजपने उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्याला झुकते माप दिले आहे.