ETV Bharat / bharat

Nora and Jacqueline started quarreling पिंकी इराणी समोर येताच नोरा जॅकलीनचे कडाक्याचे भांडण, पोलिसांनी हस्तक्षेप केला - Film actress Nora Fatehi

२०० कोटींहून अधिक फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चित्रपट अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या चौकशी दरम्यान महाठग सुकेश चंद्रशेखरची सहाय्यक पिंकी इराणीला समोर आणले. यानंतर दोन्ही अभिनेत्री तिच्याशी अक्षरशः भांडू लागल्या. ( Nora and Jacqueline started quarreling ). शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करीत हे भांडण थांबवावे लागले.

interrogation with Nora and Jacqueline
interrogation with Nora and Jacqueline
author img

By

Published : Sep 16, 2022, 4:08 PM IST

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेक तास चौकशी केली. २०० कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोघींची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान दोघींचा सामना सुकेश चंद्रशेखरची सहाय्यक पिंकी इराणीशी झाला. पिंकी इराणीशी समोरासमोर प्रश्नोत्तरे झाल्याने दोघींमध्ये कडाक्याचे भांडण ( Nora and Jacqueline started quarreling ) झाले. भांडण इतके वाढले की हाणामारीची वेळ आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही अभिनेत्रींनी पिंकी इराणीवर आरोप केले आणि जोरजोरात भांडण सुरू केले. या दोन्ही अभिनेत्रींनी पिंकी इराणी हीच त्यांच्या गुन्ह्यामागे कारण असल्याचे सांगितले. यादरम्यान दोन्ही अभिनेत्री आणि पिंकी इराणी यांच्यात दिल्ली पोलिसांना अनेकवेळा हस्तक्षेप करावा लागला.

चौकशी दरम्यान अभिनेत्री अस्वस्थ - बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीनफर्नांडिस यांच्यावर बुधवारी आणि गुरुवारी पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रींनी इतक्या लांबलचक तपास प्रक्रियेत याआधी कधीच भाग घेतलेला नव्हता. त्यामुळे त्या अस्वस्थ दिसत होत्या. यादरम्यान पोलिसांनी अनेकवेळा चौकशीला ब्रेक दिला आणि दिल्लीतील नामांकित रेस्टॉरंटमधून त्यांच्यासाठी नाश्ता मागवला. जामीन मिळवण्याच्या बहाण्याने पत्नीची २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणारा तिहार तुरुंगातील रॅनबॅक्सीचा माजी प्रवर्तक सुकेश चंद्रशेखर, चित्रपट अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. आपल्यावर पैसा उधळणारा सुकेश चंद्रशेखर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे हे या दोन्ही अभिनेत्रींना माहीत नव्हते. मात्र, जेव्हा त्यांना वास्तव कळले तेव्हा त्याच्यापासून त्या दूर गेल्या. प्रथम, सुकेशने नोराचा मेहुणा बॉबी मार्फत त्यांना बीएमडब्ल्यू कार दिली. महागडे मोबाईल आदी भेटवस्तू देऊन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण लवकरच नोराला सुकेशबद्दल कळाले, त्यानंतर ती सुकेश चंद्रशेखरपासून लांब गेली. नोराशी मैत्री न झाल्याने सुकेशने जॅकलीनवर पैशांची उधळपट्टी सुरू केली. तिलाही त्याचा फटका बसला.

सुकेशशी लग्न करण्याची बाब सलमान खान आणि अक्षयसोबत शेअर केली होती - जॅकलीनने सुकेशला मोठी राजकीय पोहोच आणि प्रचंड पैसा असलेला व्यक्ती मानून त्याच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या मैत्रीवर खूश झालेल्या जॅकलिनने सुकेशसोबत लग्न करण्याची बाब अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्याशी शेअर केली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन्ही अभिनेत्रींच्या केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान जॅकलिनने सांगितले की, सुकेशचे आधीच लग्न झाले आहे याची तिला माहिती नव्हती. तसेच तो अभिनेत्री लीना मारिया पाल हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतो.

जॅकलिनच्या कुटुंबाला भेट म्हणून महागड्या कारही मिळाल्या - दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या वडिलांना २०२० मध्ये २०१३ मॉडेलची जुनी पोर्श कार आणि एक जुनी बीएमडब्ल्यू कार तिच्या आईला दिली होती. उत्तर कॅरोलिना, यूएसमधील बहिणीलाही दिली होती. एक जुनी बीएमडब्ल्यू कार आणि जॅकलिनला नवीन मिनी कूपर कार देण्यात आली. पोलिसांचे म्हणणे आहे की, जॅकलिनकडून सुमारे 50 प्रश्नांची लेखी उत्तरे घेण्यात आली आणि 75 प्रश्न तोंडी विचारण्यात आले.

लवकरच होणार चौकशी - पोलीस सूत्रांनुसार सुकेश प्रकरणात अभिनेत्री निकिता तांबोळी, चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांचीही लवकरच चौकशी होऊ शकते. ते सुकेशला भेटले होते. याशिवाय पुढील आठवड्यात पुन्हा जॅकलिनची चौकशी करण्यासाठी समन्स बजावण्यात येणार आहे. सुकेशने जॅकलीनचा मॅनेजर प्रशांतला आठ लाखांची बाईकही दिली होती. पोलिसांनी ती जप्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.