ETV Bharat / bharat

Fraud Racket in Noida : विदेशात नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा नोएडामध्ये पदार्फाश, सुरू होते बनावट कॉल सेंटर - Fraud Racket in Noida

नोएडाचे अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह ( Additional DCP of Noida Ranvijay Singh  ) यांनी सांगितले की, या रॅकेटशी संबंधित आरोपी पूर्वी नोकरी देणार्‍या वेबसाइटवरून बेरोजगार तरुणांचा डेटा विकत घेत असत. यानंतर त्याला कॉल सेंटरवरून बोलावण्यात ( call center for fake job  ) आले. मग ते विदेशात मोठ्या पॅकेजच्या बहाण्याने विदेशी कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर देत असत.

टोळीचा नोएडामध्ये पदार्फाश
टोळीचा नोएडामध्ये पदार्फाश
author img

By

Published : May 25, 2022, 12:34 PM IST

नोएडा - विदेशात नोकरी मिळवून देण्याकरिता फसविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी नोएडामध्ये पर्दाफाश ( Noida Police busted a gang ) केला आहे. नोएडा पोलीस स्टेशन सेक्टर 113 आणि आयटी सेलच्या माध्यमातून या टोळीतील 10 जणांना छापा टाकून ( fake job ad gang noida ) अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रथम आरोपी पवनला सेक्टर 70 पोलीस स्टेशन फेज-3 मधून अटक केली. त्यांच्या सांगण्यावरून मयूर विहार फेज-1 येथून 9 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेसात लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

अटकेतील आरोपी दिल्लीतील मयूर विहार फेज वनमध्ये बनावट कॉल सेंटर्स उघडून लोकांचा डेटा घेऊन फसवणूक करत होते. नोएडातील सेक्टर 75 मध्ये राहणारे नरेंद्र शिंदे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत छापा टाकून टोळीशी संबंधित 10 जणांना अटक केली. पवन कुमार, जितेश कुमार रामकिशन, दीपेंद्र कुमार, प्रदीप कुमार सिंह, अरविंद कुमार यादव, तेजपाल सिंह, रोहित कुमार, सुभाष चंद्र आणि रामकृष्ण सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फसवणूक करण्याकरिता कॉल सेंटर- पोलिसांनी आरोपींकडून वाहन, 674000 रोख, 17 मोबाईल आणि सात लॅपटॉप जप्त केले आहेत. विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फसवणूक करण्यासाठी आरोपींनी कॉल सेंटरही उघडले होते. याद्वारे लोकांची फसवणूक करण्यात आली होती. तक्रारदार नरेंद्र शिंदे यांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सिंगापूर येथील एका बांधकाम कंपनीत नोकरी लावण्याच्या नावाखाली त्याच्यांकडून आरोपींनी दोन लाख रुपये घेतले.

विदेशात नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा नोएडामध्ये पदार्फाश,

विदेशी कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर - नोएडाचे अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह ( Additional DCP of Noida Ranvijay Singh ) यांनी सांगितले की, या रॅकेटशी संबंधित आरोपी पूर्वी नोकरी देणार्‍या वेबसाइटवरून बेरोजगार तरुणांचा डेटा विकत घेत असत. यानंतर त्याला कॉल सेंटरवरून बोलावण्यात ( call center for fake job ) आले. मग ते विदेशात मोठ्या पॅकेजच्या बहाण्याने विदेशी कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर देत असत. यादरम्यान तरुणांकडून नोंदणीच्या नावाखाली किरकोळ रक्कम वसूल करण्यात आली. बेरोजगार तरुण पूर्णपणे जाळ्यात आल्याची आरोपींना खात्री झाल्यावर मोठ्या रकमेची मागणी करत असत.

बनावट सीमकार्डवरून संपर्क-आरोपी मोबाईल आणि सिम बंद करायचे. त्यांच्याकडून जप्त केलेली सर्व सिमकार्ड दुसऱ्याच्या नावाने घेतली आहेत. त्यांचे नाव आणि पत्ता बनावट आहे. या लोकांनी बनावट पत्त्यांवर बँक खातीही उघडली आहेत. या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत. या टोळीचा सूत्रधार जितेशकुमार आहे. सध्या सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल, डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा-Hardik Patel : हार्दिक पटेल 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.. लवकरच मोदी-शहा यांची घेणार भेट

हेही वाचा-आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या आमदाराला ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी अटक

हेही वाचा-Sugar Export Restricted : साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारचे निर्बंध..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.