ETV Bharat / bharat

नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल फागू चौहान हे आज बिहारचे 37वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

नीतीश कुमार
nitish kumar
author img

By

Published : Nov 16, 2020, 9:14 AM IST

Updated : Nov 16, 2020, 1:07 PM IST

पाटणा - नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात होणार आहे. राज्यपाल फागू चौहान हे नितीश कुमार यांना शपथ देतील. नितीश कुमार यांच्यासमवेत अनेक मंत्र्यांनी शपथ घेण्याचीही शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे, मास्क वापरणे सक्तीचे केले आहेत.

शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात-

यापूर्वी एनडीएच्या आमदारांनी नितीश कुमार यांना त्यांचा नेता म्हणून निवडले. रविवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांना विधिमंडळ नेते म्हणून निवडण्यात आले. यानंतर नितीश यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली. तसेच सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. आता त्यांच्या शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

अमित शहा आणि जे पी नड्डा राहतील उपस्थित-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील, असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.

तेजस्वी यादव राहणार अनुपस्थित-

तसेच, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव बिहारच्या नितीशकुमार यांच्या पाटणा येथे होणार्‍या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

तारकिशोर प्रसाद यांची निवड-

भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून तार किशोर प्रसाद यांची निवड करण्यात आली. तेच उपमुख्यमंत्री असतील, असे सांगितले जात असले तरी, भाजपा किंवा जनता दल युनायटेडने (जेडीयू) या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन दिले नाही.

दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला-

रविवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे ट्विट समोर आले होते. गिरीराज यांनी बिहारचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांना टॅग करत लिहिले की, 'तुम्ही नेते आहात, तुमच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. भविष्यात तुम्ही भाजपचे नेते राहाल, पदामुळे कोणीही लहान-मोठे होत नाही', गिरीराज यांच्या या ट्विटनंतर, सुशील मोदींच्या जागी दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला अवलंबता येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

10 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 125 जागा मिळाल्या. त्यापैकी 74 जागा भाजपच्या खात्यात गेल्या. राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधनने नितीशच्या विरोधात 110 जागांवर विजय मिळविला.

हेही वाचा- ज्या हाताने राखी बांधली, त्याच हातावर आज भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ

हेही वाचा- नितीश कुमार सातव्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Last Updated : Nov 16, 2020, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.