ETV Bharat / bharat

नीरव मोदीला झटका, भारतात लवकरच प्रत्यार्पण - पीएनबी घोटाळा प्रकरण

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यास लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय नीरव मोदीकडे आहे.

नीरव मोदी
नीरव मोदी
author img

By

Published : Feb 25, 2021, 4:59 PM IST

लंडन - पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदीला जोरदार धक्का बसला आहे. नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पणासंदर्भात दोन वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर आज लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने निर्णय दिला आहे. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय नीरव मोदीकडे आहे.

नीरव मोदीने साक्षीदारांना धमकावले असून पुरावे नष्ट करण्यासाठी कट रचल्याचे न्यायालयाने म्हटलं. निरव मोदीसाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बराक नंबर 12 योग्य असून वैद्यकीय आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे वेस्टमिन्स्टर न्यायमूर्तीने म्हटलं. तसेच नीरव मोदीविरोधात भारतात गुन्हा दाखल असून त्यासाठी त्याला भारतीय न्यायालयात हजर होणे गरजेचे आहे, असेही न्यायामूर्तींनी नमूद केले. नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तरुंगात कैद आहे.

निरव मोदीला कारागृहात 'या' मिळणार सुविधा -

आर्थर कारागृहातील बराक नंबर 12 ही सर्वाधिक सुरक्षित कोठडी असून या कोठडीत पुरेसा सूर्य प्रकाश, हवा आणि शुद्ध पाण्याची सोय करून देण्यात आली आहे. निरव मोदी याला कारागृहात ठेवल्यास त्याच्या मागणीनुसार लाकडी पलंग देण्यात येणार आहे. मोदीला त्याच्या मागणीनुसार दिवसभरात 1 तासाहून अधिक वेळ कोठडी बाहेर येऊन व्यायाम करण्यासाठी परवानगीसुद्धा देण्यात येणार आहे. आर्थर रोड कारागृहातील 12 नंबरची बराक हा सीसीटीव्हीच्या देखरेखीत आहे. यामुळे हा बराक सुरक्षित समजला जाते.

पीएनबी घोटाळा प्रकरण -

मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेत निरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोक्सीने मिळून 200 कोटी डॉलरचा कर्ज घोटाळा केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हा दाखल झाल्यानंतर निरव मोदी देश सोडून इंग्लडला पळून गेला होता. नीरव मोदीला 13 मार्च 2019 मध्ये लंडनमधून अटक करण्यात आली होती. नीरव डिसेंबरमध्ये त्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) घोटाळ्याच्या खटला चालवण्यासाठी नीरव मोदी भारताला हवा आहे.

निरव मोदीची संपत्ती जप्त केली होती -

8 जून 2019 ला मुंबईतील विशेष न्यायालयाला निरव मोदीची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार ईडीला दिले. सक्तवसुली संचलनालयाने फरार हिरे व्यापारी निरव मोदीची राजस्थानातल्या जैसलमेरमधील 48 कोटींची संपत्ती जप्त केली होती. यात जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत मुंबईतील वरळी येथील चार फ्लॅट, अलिबागच्या किनाऱ्यावरील फार्म हाऊस आणि जमीन, जैसलमेरमधील पवनचक्की प्रकल्प, लंडन आणि संयुक्त अरब अमिरात मधील फ्लॅट, शेअर्स आणि बँकेतील ठेवींचा समावेश आहे. ही सर्व संपत्ती फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.