ETV Bharat / bharat

NIA probe: लंडनमधील भारतीय दूतावासावरील हल्ल्याची एनआयए करणार चौकशी, तिरंगा उतरवला होता खाली - proKhalistan activists attacked

लंडनमधील भारतीय दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे. गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

NIA takes over probe into attack on Indian mission in London in March
लंडनमधील भारतीय दूतावासावरील हल्ल्याची एनआयए करणार चौकशी, तिरंगा उतरवला होता खाली
author img

By

Published : Apr 18, 2023, 10:51 AM IST

नवी दिल्ली: लंडनमधील भारतीय दूतावासात खलिस्तान समर्थकांनी निदर्शन करत असताना भारताचा राष्ट्रध्वज खाली आणला होता, याप्रकरणी आता एक महिन्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणाची चौकशी हाती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाच्या काउंटर टेररिझम आणि काउंटर रॅडिकलायझेशन (CTCR) विभागाने हे प्रकरण NIAकडे सोपवले होते.

चौकशी सुरु: गृह मंत्रालयाच्या (एमएचए) आदेशानुसार दहशतवादविरोधी एजन्सीने प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आणि तपास सुरू केला. एजन्सीने हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेतले. एनआयएने या प्रकरणी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर गृह मंत्रालयाने हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, असे समजले आहे की उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह एनआयएचे एक विशेष पथक लवकरच लंडनला भेट देऊ शकते.

अमृतपालच्या सुटकेसाठी आंदोलन: लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकवलेला तिरंगा 19 मार्च रोजी फुटीरतावादी खलिस्तानी झेंडे फडकावत आणि खलिस्तान समर्थक घोषणा देत असलेल्या निदर्शकांच्या गटाने जप्त केले होते. खलिस्तान समर्थक घटकांनी आंदोलनादरम्यान राष्ट्रध्वज खाली पाडला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये अनेक आंदोलक पिवळे आणि काळे खलिस्तानचे झेंडे घेऊन आल्याचे दिसत असून, कट्टर शीख धर्मोपदेशक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचे समर्थन करताना दिसत आहे.

व्हिडिओचा पुरावा: व्हिडिओमध्ये एक आंदोलक बाल्कनीवर चढून उच्चायुक्तालयासमोरील खांबावरून भारतीय ध्वज खाली खेचताना दिसत आहे. ब्रिटीश पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना भारतीय उच्चायुक्तालयाच्या एका प्रवेशद्वाराजवळ जाण्यापासून रोखले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत भारतीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. केंद्राने ऑगस्ट 2019 मध्ये NIA कायद्यात सुधारणा केली, सायबर गुन्हे आणि मानवी तस्करी याशिवाय परदेशात भारतीय हितसंबंधांविरुद्ध दहशतवादी कारवायांचा तपास करण्यासाठी एजन्सीला अधिकार दिला.

हेही वाचा: पेट्रोलमध्ये आता २० टक्के इथेनॉल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.