ETV Bharat / bharat

ISIS दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील सहा प्रमुख आरोपींवर आरोपपत्र दाखल - terror module case

ISIS terror module case : एनआयएनं महाराष्ट्र ISIS दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील सहा प्रमुख आरोपींवर आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपींनी विविध ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखली होती.

ISIS terror module case
ISIS terror module case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 7:56 PM IST

दिल्ली ISIS terror module case : प्रतिबंधित संघटना ISIS च्या इशाऱ्यावर भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) गुरुवारी सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. एनआयएनं ISIS मॉड्यूल प्रकरणी महाराष्ट्रात छापे टाकताना जुलैमध्ये सहा आरोपींना अटक केली होती.

आरोपपत्र दाखल : विशेष एनआयए न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यात 16 साक्षीदार आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपींचे इस्लामिक स्टेटशी संबंध होते. ते भारतविरोधी प्रचार करण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते, असं त्यांनी म्हटलंय.

आरोपींचे ISIS शी संबंध : एनआयएनं सांगितलं की, आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणं, दहशतवादी संघटनेशी संबंधित दस्तऐवजांसह महत्त्वाची सामग्री जप्त केली आहे. आरोपींच्या सोशल मीडिया पोस्ट देखील सापडल्या आहेत. जप्त केलेल्या साहित्यावरून आरोपींचे आयएसआयएसशी मजबूत संबंध असल्याचं दिसून येत आहे.

'या' आरोपींविरोधात आरोपत्र दाखल : आरोप पत्रात मुंबईतील ताबीश नासेर सिद्दीकी, जुल्फिकार अली बडोदावाला लालाभाई, शरजील शेख, बोरिवलीमधील पडघा येथील अकीफ अतीक नाचन, तसंच पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख अबू नुसैबा आणि अदनानली या आरोपींची नावं आहेत.

एनआयएचे 44 ठिकाणी छापे : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं 9 डिसेंबर रोजी सकाळी महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड, पुणे कर्नाटकातील बेंगळुरू येथील 44 ठिकाणी छापे टाकले. या कालावधीत एनआयएनं बंदी घातलेल्या 15 आरोपींना अटक केली होती. दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित आरोपींच्या यावेळी मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.

विविध ठिकाणी हल्ला करण्याची योजना : 'हे' दहशतवादी मॉड्यूल भारतात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होते, असं एनआयएनं म्हटलं होतं. यातील आरोपींचा मुंबईतील कुलाबा, नरिमन पॉइंट, द गेटवे ऑफ इंडिया परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटना लक्ष्य करण्याचा हेतू होता. या दहशतवाद्यांनी अहमदाबाद (गुजरात) गांधीनगरमध्येही हल्ल्याची योजना आखली होती. याशिवाय या मॉड्यूलचा उद्देश महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचाही होता. या ठिकाणांची छायाचित्रे पाकिस्तान, सीरियाला पाठवण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा कमी, कतार न्यायालयाचा निर्णय
  2. संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींच्या पॉलीग्राफ चाचणीची मागणी
  3. हुती विद्रोहींच्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.