ETV Bharat / bharat

NIA Attached Hizb Militant Property: हिजबुलच्या दहशतवाद्याची प्रॉपर्टी एनआयएने केली जप्त, जम्मू काश्मिरात मोठी कारवाई - Hizb Militant Basit Reshi property attached

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील सोपोर शहरातील हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बासित रेशीची मालमत्ता जप्त केली आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाईत ही मोठी घटना मानली जात आहे.

NIA attaches property of Hizb militant Basit Reshi in J&K's Baramulla
हिजबूलच्या दहशतवाद्याची प्रॉपर्टी एनआयएने केली जप्त, जम्मू काश्मिरात मोठी कारवाई
author img

By

Published : Mar 3, 2023, 4:20 PM IST

जम्मू काश्मिरात मोठी कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर विविध तपास यंत्रणांद्वारे कडक कारवाई करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बासित अहमद रेशीची मालमत्ता बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) शुक्रवारी जप्त करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे दशतवाद्यांना एक कठोर संदेश जाणार आहे.

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग: सीमेपलीकडून काश्मीरमध्ये दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये रेशीचा सहभाग असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या हा दहशतवादी पाकिस्तानात आहे. ४ मार्च १९९६ रोजी जन्मलेला रेशी हा बारामुल्ला जिल्ह्यातील यंबरजलवरी शिवा डांगरपोरा सोपोर भागातील रहिवासी आहे. एनआयएचा दावा आहे की, रेशीने 18 ऑगस्ट 2015 रोजी सोपोरजवळील तुजार शेरीफ येथील पोलिस चौकीवर हल्ल्याची योजना आखली आणि अंमलात आणली. या हल्ल्यामध्ये एक पोलिस कर्मचारी आणि एक नागरिक ठार झाला होता.

गेल्या वर्षीच दहशतवादी घोषित: रेशीला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत विध्वंसक क्रियाकलापांमध्ये सहभाग आणि लक्ष्यित हत्यांच्या समन्वयासाठी नियुक्त दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्राने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे त्याला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले होते. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांविरोधात काश्मीर खोऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे.

आणखी एका दहशतवाद्याची संपत्ती जप्त: 1999 मध्ये अपहरण केलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील ओलिस प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेच्या बदल्यात अन्य दोन दहशतवाद्यांसह मुक्त झालेल्या दहशतवादी मुश्ताक अहमद जरगरची मालमत्ता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी जप्त केली. जरगर उर्फ ​​'लतराम' हा तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैय्या सईद हिच्या 1989 च्या अपहरणासह दहशतवादाशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये हवा होता. त्याच्यावर कारवाई करून एनआयएने त्याला एकप्रकारे मोठा दणकाच दिला आहे. या कारवाईमुळे आता काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांना लगाम बसण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: Blackmailed with Nude Photos and Raped: अंघोळ करताना घेतली नग्न छायाचित्रे, वर्षभर केला बलात्कार, १६ लाखांना लुटले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.