ETV Bharat / bharat

नवजात बालकाला उंदराने कुरतडले... झारखंडमधील धक्कादायक घटना

नवजात बालकाला धनबाद ( Dhanabad gov hospital ) येथे हलविण्यात आले आहे. नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक ( baby bitten by mouse ) असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

संतप्त नातेवाईक
संतप्त नातेवाईक
author img

By

Published : May 2, 2022, 4:26 PM IST

रांची- सरकारी रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला ( newborn was bitten by mouse ) आहे. जिल्ह्यातील चैताडीह येथील माता-बाल युनिटमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा जीव धोक्यात ( giridih government hospital ) आला आहे. रुग्णालयात नवजात मुलाला उंदराने कुरतडले आहे.

नवजात बालकाला धनबाद ( Dhanabad gov hospital ) येथे हलविण्यात आले आहे. नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक ( baby bitten by mouse ) असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. नवजात बालकाकडे दुर्लक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा-जमुआ जिल्ह्यातील असको येथील रहिवासी राजेश सिंह यांची पत्नी ममता देवी या चार दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे शुक्रवारी ममता यांनी मुलीला जन्म दिला. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिला चांगल्या उपचारासाठी एमसीएचच्या शिशु वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शिशू वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या नर्सने मुलीला कावीळ झाल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली. फोन केल्यानंतर कुटुंबीयांनी वॉर्डात जाऊन मुलीची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर तिला कपड्यात गुंडाळून मातेच्या ताब्यात देण्यात आले. जेव्हा कुटुंब मुलीला घेऊन धनबादला गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की मुलीला उंदराने चावले आहे.

रुग्णालय व्यवस्थापनावर राग काढला- कुटुंबीयांनी आमदार सुदिव्य कुमार आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय कुमार सिंह यांना या प्रकरणाची माहिती दिली. जिल्हाध्यक्षांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या कार्य पद्धतीबाबत थेट प्रश्न उपस्थित केला. संजय सिंह यांनी जिल्हाशल्य चिकित्सक एस. पी. मिश्रा यांच्याशी बोलून दोषींवर कारवाई करण्यास सांगितले. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश वर्मा, सतीश केडिया यांनीही रुग्णालयात पोहोचून कारवाईची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मंत्र्यांना देणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा-Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी दिले नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत

हेही वाचा-मशीद उद्ध्वस्त करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा फडणवीसांचा गौरव - प्रशांत भूषण

हेही वाचा-SC on Corona Vaccination : कोरोना प्रतिबंधक लशीची कोणावरही सक्ती शक्य नाही- सर्वोच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.