नवी दिल्ली: राघव चढ्ढा (New Punjab Rajya Sabha Member chadha) तपकिरी बेल्टने सजलेल्या स्टायलिश ऑल-ब्लॅक सूटमध्ये वाॅक करताना (While walking the ramp at Lakme Fashion Week)दिसले. त्यांनी अभिनेता अपारशक्ती खुरानासोबत रॅम्प वॉक केला. ही छायाचित्रे लॅक्मे फॅशन वीक 2022 मधील आहेत. लॅक्मे फॅशन वीकमध्ये चढ्ढा यांच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. ट्विटरवर लॅक्मे फॅशन वीकमध्ये राघव चढ्ढा यांच्या रॅम्प वॉकवर लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. पंजाबमधील 33 वर्षीय राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा हे पंजाबमधील इतर चार सदस्यांसह बिनविरोध निवडून आलेले राज्यसभेचे सर्वात तरुण सदस्य आहेत.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने राज्यसभेसाठी अशोक कुमार मित्तल, हरभजन सिंग, राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि संजीव अरोरा यांच्यासह पाच उमेदवार उभे केले होते.राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आप नेते राघव चढ्ढा यांनी दिल्ली विधानसभेचा राजीनामा दिला. याशिवाय, राघव चढ्ढा हे 20 फेब्रुवारीच्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या पंजाब युनिटचे सह-प्रभारी होते. पंजाबमधील 'आप'च्या विजयाचे श्रेयही त्यांना देण्यात आले.