ETV Bharat / bharat

लग्नाच्या तीन दिवसानंतर नवरीची गळफास घेऊन आत्महत्या - भुवनेश्वर लेटेस्ट न्यूज

लग्नाच्या फक्त तीन दिवसानंतरच नवरीने गळफास घेत आत्महत्या केली. झराना नाईक, असे मृत नवरीचे नाव आहे. ती मानसिक आजाराने ग्रस्त होती.

भुवनेश्वर न्यूज
भुवनेश्वर न्यूज
author img

By

Published : Feb 20, 2021, 9:22 PM IST

भुवनेश्वर - हातावर काढलेली मेहंदी सुखलेली नसताना लग्नाच्या फक्त तीन दिवसानंतरच नवरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना धेनकनालच्या बिडबंधमध्ये घडली आहे. झराना नाईक, असे मृत नवरीचे नाव आहे.

बिडबंधमधील मदन मोहन या तरुणाशी झरानाचे 17 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. लग्नाच्या चौथ्या दिवशी तीचा देह खोलीत पंख्याला लटकवलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

झराना मानसिक विकाराने ग्रसत् होती. ही बाब मृताच्या पालकांनी पोलिसांना लेखी कळविली आहे. तीला हा अजार असल्याचे पाच वर्षांपूर्वी समोर आले होते. तेव्हापासून हिंदोलमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ल्यानुसार तीच्यावर औषधोपचार सुरू होते, असे पालकांनी निवेदनात सांगितले.

तिच्या मानसिक आजाराचा विचार न करता मुरलीधर नाईक यांचा मुलगा मदन मोहन नाईक यांच्याबरोबर तिचे लग्न लावले. मानसिक विकृतीमुळे तीने आत्महत्या केली. मुलीच्या सासरच्या कुटुंबातील कोणीही तिच्या मृत्यूला जबाबदार नाही, असे वडील हरिहर नाईक यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.