लखनऊ - आपल्याच आईची हत्या ( Mothers Murrder ) करणारा 16 वर्षांचा मुलगा पोलिसांना सातत्याने एका अज्ञात व्यक्ती आईची हत्या केल्याचे सांगत होता. पोलिसांना संशय आहे की, त्याला पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कोणीतरी खोटं बोलण्यास भाग पाडले होते. मात्र त्याच्या घरात आढळलेल्या पिस्तुलाने त्याचे खोटे बोलणे उघडे पडले. आईला मारल्यानंतर तब्बल तीन दिवस त्याने घरातच तिचा मृतदेह लपवून ठेवला होता. आईची हत्या ( Lucknow Pubg Case ) करण्याच्या तीन दिवस आधी आणि तीन दिवस नंतर त्याने कोणालाही आपल्या घरी येऊ दिले नव्हते.
लखनऊतील यमुनापूरममद्ये आईची हत्या करण्याआधी तीन दिवस आणि नंतरचे तीन दिवस या अल्पवयीन मुलाने कोणालही घरात येऊ दिले नव्हते. त्याच्या वडिलांचे शेकडो फोन आले. परंतु त्याने त्यांचा फोन उचलला नाही. त्यानंतर अचानक 7 जूनला आईची हत्या केल्याची माहिती त्याने आपल्या वडिलांना दिली. पोलिस घरी येण्यापूर्वीच त्याने आपल्या घराचे दरवाजे उघडले होते. पोलिस येताच तो म्हणू लागला की, एक अज्ञात माणूस आपल्या घरी रोज येत होता व त्यानेच आईची हत्या करून पळून गेला.
टेबलावर आढळली पिस्तुल - 7 जूनला साधना सिंग यांची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यावर यमुनापूरममधील घरी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलगा घराच्या गेटमध्येच उभा होता. जणूकाही तो पोलिसांच्या येण्याचीच वाट पहात होता. पोलिस येताच तो म्हणाला की, एका अज्ञात माणसाने माझ्या आईची हत्या केली आहे. तो रोज घरी येत होता. त्यानंतर तो स्वतःच पोलिसांना घरात घेऊन गेला. घरात दाखल होताच एका खोलीत डायनिंग टेबलवर कोलकत्त्याच्या कारखान्यात तयार करण्यात आलेली एक पिस्तुल आढळून आली.
मुलानेच दाखविली पिस्तुल - या अल्पवयीन मुलानेच पोलिसांना टेबलावर ठेवलेली पिस्तुल दाखविली. तेव्हा पोलिसांनी त्याला प्रश्न केला की, ही पिस्तुल इथे का ठेवली आहे. त्यावर मुलगा म्हणाला की, तुम्हाला फोन करण्याआधी वडिलांना व्हिडिओ कॉल करून ही पिस्तुल त्यांना दाखविली होती आणि सांगितले की, याच पिस्तुलने आईची हत्या करण्यात आली आहे. म्हणजेच त्याचवेळी त्याने कबूल केले होते की, आईची हत्या त्यानेच केली आहे. गेटच्या बाहेर पोलिसांना पढवून ठेवलेली गोष्ट सांगणारा मुलगा पिस्तुल दाखविण्यावेळी सारे काही विसरून गेला होता. आणि त्याने कबूल केले की, याच पिस्तुलने आपणच हत्या केल्याचे वडिलांना सांगितले आहे. घटनास्थळावरच त्याने कबुली दिल्यावरही आरोपी मुलगा आकाश नावाच्या इलेक्ट्रिशीअनवर हत्याचा आरोप करीत होता.
वडिलांना व्हिडिओ कॉल अन् 2 तासांनी पोलिसांना माहिती - आईची हत्या केल्यावर आपल्या छोट्या बहिणीसोबत तीन दिवस हा अल्पवयीन मुलगा घरातच राहिला. 7 जूनला सायंकाळी 6 वाजता त्याने आसनसोल, कोलकत्ता येथे भारतीय लष्करात अधिकारी असलेले आपले वडील नवीन सिंह यांना त्याने कॉल केला. मात्र, साधा कॉल न करता त्याने वडिलांना व्हिडिओ कॉल केला. वडिलांना त्याने सांगितले की, त्यांच्याच पिस्तुलाने आईची हत्या झाली आहे. त्यानंतर नवीन सिंह आपल्या चुलत भावाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांपर्यंत दोन तासांत ही माहिती पोहोचली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांतील कोणीही त्या आरोपी मुलाशी बातचित केली नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, त्या मुलाला खोटं बोलण्यासाठी कोणी सांगितलं होतं. आणि त्याच व्यक्तीने मुलाला पोलिस आल्याची माहिती देत दरवाजा उघडून ठेवण्यास सांगितले होते.
पढवून दिलेले बोलतोय - बाल संरक्षण आयोगच्या सदस्य सुचिता चतुर्वेदी ासंगतात की, आईच्या हत्येनंतर हा मुलगा बाल सुधार गृहात आहे. बाल कल्याण समिती (CWC) आणि किशोर न्याय बोर्डाच्या सदस्यांनी दोन वेळा त्याची समजूत काढली आहे. या दरम्यान, तो मुलगा त्याला पढवून दिलेली वाक्येच बोलत असल्याचे दिसत आहे. हे सदस्य त्याच्याशी पुन्हा बोलणार आहेत. त्यातून हे लक्षात येऊ शकेल की, त्याला हे सर्व सांगण्यासाठी कोणी सांगितले.
हेही वाचा - Moose Wala murder : सिद्धू मुसेवाला हत्याकांड; कोण आहे संतोष जाधव, कसा वळला गुन्हेगारीकडे