ETV Bharat / bharat

The Great Escape : इंग्रज अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन नेताजींनी गाठले जपान - The Great Escape

इंग्रजांच्या नरजकैदेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एका पठाणाचा वेश धारण केला होता. त्यानंतर मोठ्या शिताफीने ते कोलकत्यातील घरातून बाहेर पडले. इतिहासात ही घटना द ग्रेट एस्केप म्हणून ओळखली जाते.

The Great Escape
नेताजी
author img

By

Published : Jan 23, 2021, 12:52 PM IST

कोलकाता - भारतीय स्वातंत्र्य लढा जोमात असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजांनी नरजरैदेत ठेवले होते. मात्र, संपूर्ण देशाला स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवणारे आणि त्यासाठी धडपडणारे नेताजी थोडीच घरात शांत बसणाऱ्यातले होते. इंग्रजांच्या नरजकैदेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एका पठाणाचा वेश धारण केला होता. त्यानंतर मोठ्या शिताफीने ते कोलकत्यातील घरातून बाहेर पडले. इतिहासात ही घटना द ग्रेट एस्केप म्हणून ओळखली जाते.

रात्रभर गाडी चालवत पोहचले धनबादजवळ -

इल्गिन रोडवरील निवास्थानाबाहेर ब्रिटिश गुप्तचर अधिकारी पहारा देत असताना नेताजी इंग्रजांना गुंगारा देऊन बाहेर पडले. बीएल ७१६९ या आपल्या कारने नेताजी रात्रीचे कोलकाता शहराच्या बाहेर पडले. नेताजी यांचा पुतण्या शिशिर बोस रात्रभर कार चालवत त्यांना धनबादजवळ घेवून आला. डॉ. शिशिर बोस यांचा मुलगा सुगातो याने ईटीव्ही भारतशी खास चर्चा करत नेताजींच्या भारतातून पलायनाची कहानी सांगितली.

इंग्रज अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन नेताजींनी गाठले जपान

१६ जानेवारी १९४१ च्या पहाटे नेताजी सुमारे दीड वाजता आपल्या खोलीतून बाहेर आले. घराखाली गाडी उभी केली होती. नेताजी आपल्या वंडर डब्ल्यू २४ या कारने घराबाहेर पडले होते. त्यात नेताजी बसले. नेताजींचा भाचा शिशिर बोस याने रात्रभर गाडी चालवत नेताजींना धनबादजवळील गोम गावापर्यंत पोहचवले.

गोममध्ये त्यांना मोहम्मद अब्दुल्ला भेटले. मोहम्मद अब्दुल्ला यांचे नातू शेख मोहम्मद फरखरुल्लाह यांनी ईटीव्ही भारतशी बोलातना सांगितले की, स्वांतत्र्याच्या लढाईत नेताजी कायम माझे आजोबा मोहम्मद अब्दुल्ला यांना भेटण्यास वेष बदलून येत असत. १८ जानेवारी १९४१ ला नेताजी माझ्या आजोबांना भेटले. तेव्हा ते एका पठाणाच्या वेशात होते. दोघांनी चर्चा केली. त्यानंतर एका शिंप्याने त्यांना रात्री बारा वाजता गोम रेल्वे स्टेशनवरून कालका एक्सप्रेसमध्ये बसवले. तेव्हा गाडी तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. हा नेताजींचा भारतातील शेवटचा प्रवास होता.

नेताजी या गाडीने झारखंडला पोहचले
नेताजी या गाडीने झारखंडला पोहचले

अमृतसरवरून पेशावर अन् पुढे जपानचा प्रवास

सुभाषचंद्र बोस कालका एक्सप्रेसने अमृतसरला पोहचले. तेथून रस्त्याने पेशावर शहरात पोहचले. तेथून ते अफगाणिस्तानला गेले. फक्त इंग्रजांनाच चकमा देत नाही तर विविध देशांतील सुरक्षा यंत्रणांना त्यांनी चकमा दिला. तुर्कस्तान, जर्मनीहून ते जपानला पोहचले. इतिहासात ही घटना 'द ग्रेट एस्केप ऑफ नेताजी' म्हणून ओळखली जाते.

त्यानंतर अनेक महिन्यानंतर नेताजींनी रेडिओ स्टेशनद्वारे देशवासियांना संबोधित केले. आझाद हिंद सेनेची स्थापना करत त्यांनी ब्रिटीश सत्तेला आव्हान दिले. सुभाष चंद्र बोस यांचे तेव्हाचे भाषण आजही सर्वांना प्रेरणा देते. आता आपले स्वातंत्र्य निश्चित आहे. मात्र, स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यावे लागते. तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा, ही घोषणा नेताजींनी यावेळी दिली. भारताच्या स्वातंत्र्याचा हा मंत्र बनला.

यानंतरची सुभाष चंद्र बोस यांनी जयंती गुढ राहीली. ते गुप्तपणे अनेक देशांत प्रवास करत असत. तसेच राजकीय नेत्यांना भेटून भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी मदत मागत. १९४५ साली विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला असे मानले जाते. मात्र, याबाबतही अनेक वादविवाद आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.