श्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या बारामुल्लामध्ये रात्री मोठा अपघात झाला. नूरबाग शेख कॉलनीत लागलेल्या आगीत अनेक घरे जळून खाक झाली. पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज या भागाला भेट दिली आणि बाधित कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "बारामुल्लाच्या तरुणांची मी आभारी आहे, ज्यांनी आगीच्या संकटात नागरिकांची सुटका केली आणि मदत करण्यासाठी पुढे आले. सरकारने या लोकांसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था केली पाहिजे. जेणेकरून त्यांना घरे परत मिळतील. उत्तर काश्मीरमधील गरीब लोकांच्या मदतीसाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
मेहबुबा मुफ्ती यांनी सोपोर अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन नागरिक ठार झाले. अशा हल्ल्यांनी आपण आणखी मागे खेचले जातो. चर्चेच्या माध्यमातून आपण प्रत्येक समस्येवर तोडगा काढू शकतो. बंदुकी समस्या सोडवत नाहीत. दहशतवादामुळे काश्मीरमधील जनतेची बदनामी होते. अशा हल्ल्यांचा विरोध दर्शवला आहे, असे त्या म्हणाल्या.
मनोज सिन्हा यांनीही नोंदवला हल्ल्याचा निषेध -
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. हिंसाचार करणारे हे मानवतेचे शत्रू आहेत. अशी घृणास्पद आणि भ्याड कृत्याला माफ केले जाणार नाही, असे ते म्हणाले. सोपोरमध्ये नागरिक आणि सुरक्षा कर्मचार्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवतो. या हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे नायब राज्यपाल म्हणाले.