मुंबई - देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यांची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहेत. याचबरोबर महामारीचा अभ्यास करुनच परीक्षेची आगामी तारीख ठरवली जाईल, असेसुद्धा त्यांनी सांगितले आहे.
वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर शाळा व कॉलेजांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 18 एप्रिलला ही परीक्षा होणार होती. देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तारीख लवकरचं जाहीर करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा -
विशेष म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोहीम चालविली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगोदरच देशभरतील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्याला प्रतीसाद देत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहेत.
हेही वाचा - आंध्र प्रदेश: मुलीवर झालेल्या बलात्कारातून झाली एकाच कुटुंबातील ६ जणांची हत्या