ETV Bharat / bharat

Kota Student Suicide : कोटा फॅक्टरीचे भीषण वास्तव; पाच दिवसांत तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या - कोटा शहरात बिहारच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

राजस्थानच्या कोटा शहरात कोचिंग घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गेल्या पाच दिवसांत आत्महत्येची ही तिसरी घटना आहे.

Suicide
Suicide
author img

By

Published : May 12, 2023, 7:04 PM IST

कोटा (राजस्थान) : कोटा शहरातील लँडमार्क परिसरात कोचिंग घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात अभ्यासाच्या ताण - तणावाबाबत लिहिण्यात आले आहे. हा विद्यार्थी 'नीट' परिक्षेच्या तयारीसाठी एका वर्षापूर्वी बिहारमधून कोटा येथे आला होता. नुकतीच त्याने परीक्षाही दिली होती. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. संबंधितांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कुटुंबीय आल्यानंतर शवविच्छेदन आणि इतर प्रक्रिया केली जाईल. या सोबतच विद्यार्थ्याची खोलीही सील करण्यात आली आहे.

विद्यार्थी बिहारचा रहिवासी होता : कुन्हडी पोलिस स्टेशन अधिकारी गंगा सहाय शर्मा यांनी सांगितले की, मृत विद्यार्थ्याचे नाव नवलेश कुमार असून तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. तो गेल्या एका वर्षापासून कोटा येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीत व्यस्त होता. तो भाड्याने खोली घेऊन राहत होता. तेथे राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी तो दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आज त्याच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. त्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात अभ्यासाच्या ताण तणावाबाबत लिहिलेलं आहे.

आत्महत्येची पाच दिवसातील तिसरी घटना : कोटा शहरात विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची 5 दिवसातील ही तिसरी घटना आहे. तत्पूर्वी, 8 तारखेच्या रात्री मूळचा बंगळुरू कर्नाटक येथील रहिवासी विद्यार्थी नसीर याने विज्ञान नगर पोलीस स्टेशन परिसरात आत्महत्या केली होती. यानंतर 10 तारखेला बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथील विद्यार्थी धनेश कुमार यानेही लँडमार्क परिसरातच आत्महत्या केली होती. याच शुक्रवारी नवलेशच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. तिन्ही विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशाची तयारी करत होते.

हेही वाचा :

  1. Student Suicide : एका मित्राकडून उसने पैसे घेऊन दुसऱ्याला दिले, दुसऱ्याने दिला दगा, 'त्याची' आत्महत्या
  2. NIA Raids : बनावट नोटांच्या पुरवठा प्रकरणांमध्ये 'एनआयए'चे मुंबईसह ठाण्यात छापे
  3. Shot To Youth : हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने झाडली तरुणावर गोळी; तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.