हैदराबाद NDMA test Cell Broadcasting : आज तुमचा फोन वापरत असताना तुम्हाला सायरनचा आवाज आला आणि एक मेसेज पॉपअप झाला असेल. त्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी हा चाचणी संदेश आहे. आपणाला काही करण्याची गरज नाही असे लिहिलेले आपण वाचले असेल. वास्तविक काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण हा फक्त राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा एक चाचणी संदेश आहे.
मोबाईल फोनवर सॅम्पल अलर्ट - राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं देशातील जवळपास सर्व मोबाईल फोनवर सॅम्पल अलर्ट म्हणून हा संदेश पाठवला आहे. असा संदेश पाठवून सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टमची चाचणी संस्थेनं केली आहे. एक नमुना संदेश म्हणून असा संदेश चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. धोक्याचा इशारा देण्यासाठी या प्रणालीची कितपत तयारी आहे, ते पाहण्यासाठी हा संदेश पाठवण्यात येत आहे. असा संदेश वाचून सध्या तरी चाचणी सुरू असल्यानं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही.
नमुना चाचणी संदेश - या संदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की, "भारत सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टमद्वारे पाठवलेला हा नमुना चाचणी संदेश आहे." सायरन अलर्टने प्रत्येकाला सावध करुन, संदेशात असं म्हटलं आहे की त्याकडे दुर्लक्ष करा आणि या संदेशावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा कारवाई करण्याची आवश्यकता नाही असंही म्हटलं.
या संदेशाकडे दुर्लक्ष करा - या संदेशात असंही पुढे म्हटलं आहे की, "कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करा कारण तुमच्याकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यक नाही." हे संदेश देशातील त्या-त्या भागातील संबंधित भाषांमधून जवळपास सर्व अँड्रॉइड फोन्सवर सकाळी 11.41 वाजता आले. ते राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेल्या "पॅन-इंडिया इमर्जन्सी अॅलर्ट सिस्टम" च्या 'टेस्ट' चा भाग आहे.
आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सूचना देणे - या संदेशामध्ये तारीख आणि टाईमस्टँपही आहे. या संदेशाचं "सार्वजनिक सुरक्षा वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सूचना देणे" हे उद्दिष्ट असल्याचं म्हटलं आहे. भौगोलिक-स्थानावर आधारित प्रादेशिक भाषेतील दुसरा संदेश दूरसंचार विभागाने पुश केला आणि तो दुपारी 12.04 वाजता आला. दुपारी १२.२५ वाजता तिसरा हिंदीत आला. ETV भारत टीमने याबाबत काही वापरकर्त्यांकडून माहिती घेतली असता असं दिसून आलं की Apple फोनला तीनपैकी एकही अलर्टचा मेसेज मिळाला नाही.
हेही वाचा..