ETV Bharat / bharat

Nawab Malik ED Custody : नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ - Additional Attorney General

नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. ( Nawab Malik ED Custody Increase ) ईडीने मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयात केली होती. त्यानंतर मलिक यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ देण्यात आली असून 7 मार्चपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अल्पसंख्याक मंत्री  नवाब मलिक
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Mar 3, 2022, 1:05 PM IST

Updated : Mar 3, 2022, 4:26 PM IST

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Nawab Malik Case) मलिक यांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ देण्यात आली आहे. दरम्यान, मलिक मुंबई सत्र न्यायालयात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. ( Nawab Malik ED Custody ) त्या पार्श्वभूमीवर मुंबई सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  • Special PMLA court extends the Enforcement Directorate (ED) custody of Maharashtra minister and NCP leader Nawab Malik till 7th March. He was connected by ED in connection with Dawood Ibrahim money laundering case.

    (File photo) pic.twitter.com/4P2buZth02

    — ANI (@ANI) March 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चौकशी होऊ शकली नसल्याने मागितली कोठडी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी पाउणे तीन वाजता अटक करण्यात आली होती. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान नवाब मलिक जेजे रुग्णालयात भर्ती होते. त्यामुळे त्यादिवसांत त्यांची चौकशी होऊ शकली नाही, म्हणून आणखीन रिमांडची गरज असल्याचा युक्तीवाद ईडीने न्यायालयात केला होता. त्यांचा हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने मलिक यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण? - मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मंत्री नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने मलिकांना ईडी कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत आज संपत आहे. ( Nawab Malik ED custody ) दरम्यान, मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीचा दिलासा मिळावा म्हणून धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने तातडीने दिलासा देण्याची याचिका फेटाळली आहे.

3 एकर वडिलोपार्जित मालमत्ता - ईडीने 1989 ची तक्रार सादर केली आहे. मुंबईतील कुर्ला भागात असलेली एक प्रमुख मालमत्ता हडप करण्यासाठी अंडरवर्ल्डशी व्यवहार केल्याचा मलिक यांच्यावर ईडीने आरोप केला आहे. ईडीने रिमांड कॉपीमध्ये म्हटले आहे की, तक्रारदार मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेला समजले की, तिची 3 एकर वडिलोपार्जित मालमत्ता नवाब मलिक यांनी हडप केली आहे, असे ईडीने म्हटले आहे.

300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार - दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ईडीने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ईडीने ही कारवाई केली.

धमकावून बळकावल्या मालमत्ता - ईडीने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह ( Additional Attorney General ) यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून 3 फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे.

सध्या 300 कोटी रुपये आहे किंमत - दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचा दावा ईडीने 14 दिवसांची कोठडी मागताना केला होता. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.

हेही वाचा - OBC Reservation : राज्य सरकारला मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाचा ओबीसी आरक्षणावर मोठा निर्णय

Last Updated : Mar 3, 2022, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.