ETV Bharat / bharat

NCP MP Praful Patel: 'शरद पवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाहीत'; प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया - शरद पवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाहीत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाहीत. त्यांनी यापूर्वी असे सांगितले आहे. शिवाय ते याचा Praful Patel statement Sharad Pawar PM election विचार देखील करत नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

NCP MP Praful Patel
NCP MP Praful Patel
author img

By

Published : Sep 11, 2022, 5:09 PM IST

Updated : Sep 11, 2022, 5:56 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाहीत. त्यांनी यापूर्वी असे सांगितले आहे. शिवाय ते याचा Praful Patel statement Sharad Pawar PM election विचार देखील करत नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. दिल्लीत राष्ट्रवादीचे दोन दिवशीय अधिवेशन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ते माध्यमाशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही भूमिका बजावणार, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

  • Delhi | Sharad Pawar is not aspiring for PM post, he didn't do it in the past, he is not thinking of it at present... NCP has found national recognition, will play imp role in General elections: NCP MP Praful Patel pic.twitter.com/TvUKlhVUYk

    — ANI (@ANI) September 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रवादीचे दोन दिवशीय अधिवेशन दिल्लीत आयोजित (NCP two day convention) करण्यात आले आहे. यात देशभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल दाखल झाले आहेत. यावेळी उपस्थितीतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) संबोधित केले. या अधिवेशनात राष्ट्रवादी कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल म्हणाले की, सर्व मतभेद असूनही सर्व बिगरभाजप पक्षांना एकत्र आणणारे शरद पवार हे एकमेव नेते आहेत. तसेच, केसीआर, स्टॅलिन, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, आणि काँग्रेसचे नेते शरद पवारांकडे येतात. यामागे पवारांची दूरदृष्टी आहे. ते सर्व पक्षांना एकत्र आणू शकतात असही पटेल म्हणाले आहेत.

राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची शनिवारी कार्यकारिणीची बैठक झाली. जिथे पक्षाने विरोधी एकजुटीचे आवाहन केले होते. याच बैठकीत शरद पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यावर आज रविवारी राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना शरद पवार यांनी पक्षश्रेष्ठींना सात मुद्द्यांवर एकत्र येण्यास सांगितले. यामध्ये शेतकरी, जातीय सलोखा, महागाई, महिला सुरक्षा, बेरोजगारी, सीमा समस्या आणि केंद्रीय संस्थांचा गैरवापर यांचा समावेश होता. यावेळी पवारांनी बिल्किस बानो प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Last Updated : Sep 11, 2022, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.