ETV Bharat / bharat

Pawar Politics... शरद पवार- प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट, तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांसोबत मंगळवारी बैठक - शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट

सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशातील विरोधकांची एकजूट व्हायला हवी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे चार तास प्रदीर्घ चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीसह देशात मजबूत तिसरी आघाडी उभी करण्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

Sharad Pawar-Prashant Kishor
शरद पवार आणि प्रशांत किशोर
author img

By

Published : Jun 21, 2021, 1:25 PM IST

Updated : Jun 22, 2021, 7:13 AM IST

नवी दिल्ली - निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही दोघांची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली होती. आता पुन्हा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूक आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. यात सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थितीवर सर्वांगिण चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला मनिष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता नाही. खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

शरद पवारांना भाजपाविरोधी आघाडीचे एक प्रमुख नेते म्हणून पाहिले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाविरोधात मोठा विरोधी मोर्चा उभारण्याच्या रणनीतीवर ते बर्‍याच काळापासून काम करत आहेत. याबद्दल त्यांनी बर्‍याच वेळा जाहीरपणे भाष्य केले. पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींनी भाजपाविरूद्ध मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रशांत किशोर यांची त्यांनी दोनदा भेट घेतली आहे. त्यामुळे आता बंगाल मॉडल हे देशात किंवा राज्यांमध्ये लागू होऊ शकतं का? यावर चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.

मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात राष्ट्र मंचच्या बैठकीपूर्वी पवार आणि किशोर यांच्यात ही बैठक झाली. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या घरी राष्ट्र मंचाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या सभेला पवार पहिल्यांदा उपस्थित राहतील. पवार आणि यशवंत सिन्हा यांच्या व्यतिरिक्त विरोधी पक्षांचे काही नेते या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे. राष्ट्र मंच हा एक राजकीय मंच नाही. परंतु भविष्यात यातून तिसरा पर्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, त्यात सरकारविरोधात राजकारणासह अन्य मुद्द्यांवर चर्चा होत असते. पवार प्रथमच राष्ट्र मंचच्या बैठकीला उपस्थित राहतील.

काय आहे राष्ट्र मंच?

राष्ट्र मंचची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत. टीएमसीचे प्रतिनिधी आणि राष्ट्र मंचचे संस्थापक म्हणून सिन्हा या बैठकीत उपस्थित असतील. सन 2018 मध्ये सिन्हा यांनी देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी राष्ट्र मंच सुरू केला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांव्यतिरिक्त, बिगर राजकीय लोकही यात सहभागी होत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविणे हा राष्ट्र मंचचा उद्देश आहे.

यापूर्वी झाली होती भेट -

यापूर्वी प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची 11 जून ला भेट झाली होती. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील घर सिल्वर ओकला जाऊन त्यांची भेट घेतली. जवळपास तीन तास या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीत देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावर आणि भाजपाल सत्तेत येण्यापासून रोखण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

प्रशांत किशोर यांच्याविषयी...

प्रशांत किशोर हे भारतीय राजकारणातील अलिकडील काळातील रणनितीकार म्हणून ओळखले जातात. प्रामुख्याने लोकसभा निवडणूक 2014 मध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपासाठी रणनिती आखली होती. आता त्यांनी भाजपाविरोधी भूमिका घेतली आहे. प्रशांत किशोर यांना स्वतः एक राजकारणी म्हणून अनेक महत्वाकांक्षा आहेत. त्यांचा स्वत: चा एक मोठा गटही आहे. यामध्ये ममता बॅनर्जी आधीच त्यांच्यासोबत आहेत. एमके स्टालिन, जगन मोहन रेड्डी आणि अरविंद केजरीवालही त्यांच्यासोबत येतील, अशी आशा प्रशांत किशोर करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अल्सरवर शस्त्रक्रिया

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यापूर्वी पित्ताशयावरील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. दरम्यान, तोंडात एक अल्सर आढळल्याने तो काढण्यात आला होता. यावेळी मलिक म्हणाले होते, की सध्या त्यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील.

ब्रीच कॅंडीत लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

शरद पवार यांना पोटात दुखू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 30 मार्चला दाखल केले होते. त्यावेळी लॅप्रोस्कोपी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 12 एप्रिलला गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटल मधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती. त्यानंतर तिसरी शस्त्रक्रियाही झाली होती. याची माहितीही नवाब मलिक यांनी दिली होती. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर पवारांचा वृत्तपत्र वाचतानाच एक फोटो समोर आला होता.

Last Updated : Jun 22, 2021, 7:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.