रायपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी याठिकाणी १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यांपैकी तिघांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 'लोन वर्राटू' अभियानाचे हे यश मानले जात आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल ३१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, यांपैकी ७७ नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
भूमकाल दिनी केले आत्मसमर्पण..
पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले, की भूमकाल दिनाच्या पार्श्वभूमीवर, लोन वर्राटू अभियानामुळे प्रेरित झालेल्या १३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या सर्वांना नक्षलवादी विचारसरणीतील पोकळपणा लक्षात आल्यामुळे त्यांनी आत्मसमर्पण केले. सध्या लोन वर्राटू अभियानांतर्गत अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत.
भूमकाल दिन..
बस्तरमध्ये हुतात्मा गुण्डाधुरच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने सर्व आदिवासी १० फेब्रुवारीला भूमकाल दिन साजरा करतात. ब्रिटिशांविरोधात आवाज उठवण्यासाठी बस्तरमध्ये भूमकालची सुरुवात करण्यात आली होती. भूमकाल म्हणजे जमीनीशी जोडलेल्या लोकांचे (स्थानिकांचे) आंदोलन. यामध्ये भूमकालचे महानायक गुण्डाधुर, डेबरीधूर आणि अन्य क्रांतीकारकांनी बलिदान दिले होते.
हेही वाचा : पोलिसाची हत्या करणाऱ्या दारू माफियाचा एन्काऊंटर! उत्तर प्रदेशात रंगला थरार