ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; 150 नक्षलवाद्यांनी जाळली २० वाहनं, कोट्यवधींच नुकसान

Naxalite Incident : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी सातत्यानं कोणत्या ना कोणत्या घटना घडवत असतात. यावेळी नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात अनेक वाहनं जाळली आहेत.

नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात पेटवली वाहनं
नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात पेटवली वाहनं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 1:12 PM IST

दंतेवाडा Naxalite Incident : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दीड डझन वाहनं पेटवून दिली आहेत. ही सर्व वाहनं खासगी बांधकाम कंपनीची आहेत. बैलाडीला रोडवर रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी ही जाळपोळ केल्याची घटना घडली असून या जाळपोळीत मोठ्या प्रमाणात वाहनांच नुकसान झालंय.

  • #WATCH | Dantewada, Chhattisgarh: On the intervening night of 26-27 November, unidentified Naxalites set on fire a total of 14 vehicles including four pickups, a JCB, a crane, two water tankers and other vehicles engaged in road construction work. Police search continues in the… pic.twitter.com/tq1pSCETEi

    — ANI (@ANI) November 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

150 हून अधिक नक्षलवादी पोहोचले : दंतेवाडा ते बैलाडीला दरम्यान सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. आरसी कॅनॉल कंपनी हे काम करुन घेत आहे. भानसी पोलीस स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंगाली कॅम्पजवळ कंपनीनं आपला कॅम्प बांधला आहे. काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास 150 हून अधिक नक्षलवादी तिथं पोहोचले आणि त्यांनी रस्ता बांधकामासाठी असलेल्या वाहनांना आग लावली. शेकडो नक्षलवाद्यांमध्ये गणवेशधारी सशस्त्र नक्षलवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.

दंतेवाडा एसपी गौरव राय यांचा नक्षलवादी घटनेला दुजोरा : नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ करुन घटनास्थळावरून पळ काढल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नक्षलवाद्यांनी घटनास्थळी उपस्थित चौकीदारांना धमकावून बांधकाम बंद पाडण्याची धमकी दिली तसंच भविष्यातही अशा घटना घडणार असल्याचं सांगितलं. घटनास्थळावरुन काही बॅनर पोस्टरही जप्त करण्यात आले आहेत. यानंतर घटनास्थळी फौजफाटा रवाना करण्यात आलाय. याप्रकरणी ग्रामस्थांचीही चौकशी केली जात आहे.

डिझेल काढून वाहनं पेटवली : प्रत्यक्षदर्शी बुधराम मरकाम यांनी सांगितलं की, रात्री एक ते दोनच्या दरम्यान 50 ते 60 सशस्त्र नक्षलवादी डांबरी प्लांटमध्ये पोहोचले आणि तिथं उपस्थित असलेल्या लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यांनी त्याला डांबरी प्लांटच्या बाजूला बंदुकीच्या धाकावर उभं केलं. यानंतर वाहनांमधून डिझेल काढून डांबरी प्लांटसह सर्व वाहनं पेटवून देण्यात आली. यानंतर सर्व नक्षलवादी पळून गेले.

सुरक्षा दल घटनास्थळी रवाना : भानसी अ‍ॅस्फाल्ट प्लांटला आग लावण्याबरोबरच नक्षलवाद्यांनी त्याठिकाणी 4 ट्रक, 2 पाण्याच्या टाक्या, 1 मिक्सर मशीन, 1 अजॅक्स, 1 पिकअप, 3 हायड्रा आणि एक डिझेल वाहन जाळलंय. रेल्वे दुहेरीकरणाच्या कामात गुंतलेल्या पोकलेन वाहनालाही नक्षलवाद्यांनी सोडलं नाही. हा डांबरी प्लांट भानसी पोलीस स्टेशन हद्दीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. जाळपोळीच्या घटनेनंतर सुरक्षा दल घटनास्थळी रवाना झालंय.

हेही वाचा :

  1. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातही नक्षली हिंसा, आयईडी स्फोटात एक जवान शहीद
  2. Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, अनेक ठिकाणी नक्षली चकमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.