नवी दिल्ली- ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सवारंभ होत ( Navratri 2022 )आहे. नवरात्र सुरू होत असल्यामुळे देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. नवरात्रोत्सव पूजन करण्यासाठीचे विधी, महत्त्व आणि त्याची मान्यता काय आहे. ते जाणून घेणार आहोत.
नवरात्रोत्सव प्रारंभ - ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सवारंभ होत ( Navratri festival begins ) आहे. 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. तो 5 ऑक्टोबर 2022 रोजी संपत आहे. त्यामुळे देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. घराच्या स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनाची पूर्वतयारी तर मोठ्या प्रमाणात सुरू असते. सन 2022मध्ये निज अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेसह नवरात्रारंभ होणार आहे. यंदा कोरोना निर्बंधनुक्त सण साजरी होत असल्याने भाविकांची श्रद्धा आणि सण-उत्सवांमधील उत्साह, चैतन्य वाढले आहे. असे म्हणायला हरकत नाही. जाणून घ्या नवरात्रोत्सव पूजन करण्यासाठीचे विधी, महत्त्व, मान्यता.
नवरात्र घटस्थापनेचे साहित्य - घटस्थापना करण्यासाठी माती, पितळेचा तांब्या, पूजेसाठी जल, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याचे पान इत्यादी साहित्यांचा वापर होतो.
नवरात्र घटस्थापना पूजा विधी - दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा. यानंतर मातीवर कलश ( Navratri Ghatasthapana Puja Ritual ) ठेवावा. अक्षता, फूल आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न टाकावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी एकत्र मिसळावे. आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशाला कुंकूवाच्या रंगाने सजवू शकता. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवावा. कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे. यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी. महादेव शिवशंकर आणि ब्रह्मदेवांचे स्मरण करावे. यानंतर भगवती देवीची पूजा करून दुर्गा सप्तशती पठण करावी. दुर्गा सप्तशती तीन भागात विभागले असून, पठण करताना एका चरित्राचे करावे.
घटस्थापनेचा मंत्र - घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम हात जोडून देवीचे स्मरण करावे. संपूर्ण पूजा साहित्य व्यवस्थीत ठेवेपर्यंत मंत्रोच्चार सुरू ( Ghatasthana Mantra ) ठेवावा. 'ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥', असा मंत्र म्हणावा. हा मंत्र म्हणून दर्भाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे. उजव्या हातात अक्षत, फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा.
शारदीय नवरात्र संकल्प मंत्र -घटस्थापनेवेळी भाविक अनेक मंत्रांचा उच्चार करू ( Sharadiya Navratri Sankalp Mantra ) शकतात. यात ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णु:, ॐ अद्य ब्रह्मणोऽह्नि द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे, अष्टाविंशतितमे कलियुगे, कलिप्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे पुण्य (आपल्या क्षेत्राचे वा भागाचे नाव घ्यावे) क्षेत्रे बौद्धावतारे वीर विक्रमादित्यनृपते: २०७७, तमेऽब्दे शार्वरी नाम संवत्सरे सूर्य उत्तरायणे शरद ऋतो महामंगल्यप्रदे मासानां मासोत्तमे आश्विन मासे शुक्ल पक्षे प्रतिपदायां तिथौ शनि वासरे (गोत्राचे नाव घ्यावे) गोत्रोत्पन्नोऽहं अमुकनामा (स्वतःचे नाव घ्यावे) सकलपापक्षयपूर्वकं सर्वारिष्ट शांतिनिमित्तं सर्वमंगलकामनया- श्रुतिस्मृत्योक्तफलप्राप्त्यर्थं मनेप्सित कार्य सिद्धयर्थं श्री दुर्गा पूजनं च महं करिष्ये। तत्पूर्वागंत्वेन निर्विघ्नतापूर्वक कार्य सिद्धयर्थं यथामिलितोपचारे गणपति पूजनं करिष्ये। 'यथोपलब्धपूजनसामग्रीभिः कार्य सिद्धयर्थं कलशाधिष्ठित देवता सहित, शारदीय नवरात्र श्री दुर्गा पूजनं महं करिष्ये। या मंत्रांचा जप तुम्ही करू शकता.