दुर्ग - मार्च महिन्यात सामन्यरित्या उन्हाळ्याला सुरुवात होत असते. पण, मागील काही दिवसांपासून देशात अंगाची लाहीलाही करणारा उकाडा जाणवत आहे. त्यातच उन्हाचा चटका नागरिकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. या उष्णतेच्या लाटेला मानवही जबाबदार आहेत. अंदाधुंद वृक्षतोड, काँक्रीटच्या जंगलामुळे वृक्षतोडीचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. जेवढी झाडे तोडली जातात, त्या संख्येत नवीन झाडे लावण्याचा विचार क्वचितच कोणी करत असेल. पण, देशात अजूनही काही निसर्गप्रेमी आहेत, जे स्वतःच्या मुलांप्रमाणे झाडांची काळजी घेत असतात.
असेच एक भिलाई येथे निसर्गप्रेमी ( Nature Lover Of Bhilai ) राहतो. बाळूराम वर्मा असे त्यांचे नाव आहे. बाळूराम वर्मा हे भिलाई स्टील प्लांट येथे काम करत होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी घरी न बसता निर्सगासाठी वेळ द्यायचे ठरवले. भिलाई परिसरातील झाडांची वाढ होत नसल्याचे त्यांच्या समोर आले. त्यामुळे त्यांनी झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. बाळूराम यांनी 1983 पासून झाडे लावण्यास सुरुवात केली. झाडांना नुकसान होऊ नये म्हणून साड्यांचे ट्रिगार्ड बनवून त्यांचे संरक्षण केले. बाळूराम यांनी आतापर्यंत 10 हजारांहून अधिक झाले लावली आहेत. तर, 1 हजारांहून अधिक झाडे ट्रिगार्ड लावून संरक्षित केली आहेत.
याबाबत बोलताना बाळूराम वर्मा म्हणाले की, माणूस निसर्गाशी खेळत आहे. लोक आपल्या स्वार्थासाठी झाडे तोडत आहेत. पण, झाडे लावण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. अजून वेळ आहे. दोन झाडे लावून झाडांना संरक्षण द्या, असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Namaz Pathan At Shivaji Park : 'शिवाजी पार्कवर नमाज पठण करु द्या'; मुख्यमंत्र्यांकडे मागणी